शेतकऱ्यांच्या दुहेरी फायद्यासाठी देशभरातील कृषिशास्त्रज्ञ रोज काही ना काही संशोधन करत असतात.यामध्ये हरियाणातील हिस्सार येथीलचौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठाने गहू, मोहरी आणि ओट्स या पिकांच्या सुधारित जाती तयार केल्या
असून यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे केवळ हरियाणातील शेतकरीच नाही तर संपूर्ण भारतातील गहू,मोहरी आणि ओट्स चा सुधारित जातींचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.खरे तर यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत तांत्रिक व्यापारीकरणाला चालना देत चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ आणि आता खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बियाणे कंपन्यांशी करार केला आहे.
अशा परिस्थितीत ही कंपनी आता विद्यापीठाने विकसित केलेल्या गव्हाचे डब्ल्यूएच 1270, मोहरीचे आर एच 725 आणि ओट्स चे ओ एस 405 बियाणे तयार करून देशातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे.
खाजगी कंपन्यांसोबत वर्षभरात 10 सामंजस्य करार
यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. बी.आर.कंबोज म्हणाले की,गेल्या वर्षभरात विविध खाजगी कंपन्यांसोबत असे दहा सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
ते पुढे म्हणाले की अशा प्रकारच्या करारावर स्वाक्षरी करून येथे विकसित केलेल्या पिकांच्या सुधारित वाणांचे बियाणे आणि तंत्र देशातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
सुधारित जातींचे विश्वासनीय आणि उच्च दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचवणे हा या कराराचा उद्देश आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढेल आणि ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतील.
या नवीन जातींची विशेषता काय आहे?
1- गहू डब्ल्यूएच 1270-या गव्हाच्या जाती ला गेल्या वर्षी देशाच्या उत्तर दक्षिण विभागात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली होती.गव्हाच्या या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी 76 क्विंटलपर्यंत असल्याचे सांगितले जात असून उत्पादन क्षमता हेक्टरी 91.5 क्विंटल आहे.
2- ओट्स ओएस 405- ओएस 405 जातीचे ओट्स देशाच्या मध्य विभागासाठी योग्य मानले जाते. त्याचे प्रति हेक्टर धान्य उत्पादन 16.7 क्विंटल आहे तर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन प्रति हेक्टर 51.3 क्विंटल आहे.
3- मोहरी आरएच 725 - मोहरीच्या आर एच 725 जातीच्या शेंगा इतर मोहरीच्या वानांच्या तुलनेत काहीसा लांब असतात त्यामुळे तेलाचे प्रमाण जास्त निघते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Study Tips:UPSC सिव्हिल सर्विस टॉपर श्रुती शर्मा यांची रणनीती आणि यशाचा मंत्र, नक्की वाचा
नक्की वाचा:टरबूज खा परंतु सांभाळून!नाहीतर टरबूज ओव्हर डोसचा होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम?
Published on: 04 June 2022, 09:45 IST