News

यवतमाळ जिल्ह्यातील राणी अमरावती या गावात दिलेश परखडे हे शेतकरी राहतात. जे की दिलेश परखडे या शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टर वरच फवारणी यंत्र लावून ते आपल्या शेतामध्ये फवारणी करतात. सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे यंत्र त्यांनी स्वतः तयार करून ट्रॅक्टर वर बसवलेले आहे. परखडे यांच्या या जुगाड यंत्रामुळे शेतीमध्ये पीक फवारणी करताना आपल्याला कोणतीही विषबाधा होत नाही त्यामुळे हे यंत्र खूप यशस्वी रित्या झाले आहे. या यंत्राद्वारे आपण फक्त २० मिनिटं मध्ये जवळपास एक एकर क्षेत्रात फवारणी करू शकतो. परखडे यांनी केलेला हा जुगाड तेथील परिसरात कौतुकाच उदाहरण ठरलेले आहे.

Updated on 07 September, 2021 7:24 AM IST

यवतमाळ जिल्ह्यातील राणी अमरावती या गावात दिलेश परखडे हे शेतकरी(farmer) राहतात. जे की दिलेश परखडे या शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टर वरच फवारणी यंत्र लावून ते आपल्या शेतामध्ये फवारणी करतात. सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे यंत्र त्यांनी स्वतः तयार करून ट्रॅक्टर(tractor) वर बसवलेले आहे. परखडे यांच्या या जुगाड यंत्रामुळे शेतीमध्ये पीक फवारणी करताना आपल्याला कोणतीही विषबाधा होत नाही त्यामुळे हे यंत्र खूप यशस्वी रित्या झाले आहे. या यंत्राद्वारे आपण फक्त २० मिनिटं मध्ये जवळपास  एक  एकर  क्षेत्रात  फवारणी  करू शकतो. परखडे यांनी केलेला हा जुगाड तेथील परिसरात कौतुकाच उदाहरण ठरलेले आहे.

या यंत्राद्वारे पिकाचे कोणत्याच प्रकारे नुकसान देखील होत नाही:

दिलेश परखडे यांनी आपल्या ट्रॅक्टर ला पुढे ३ फूट आणि मागे ४ फूट उंचीवर मोठी चाके लावलेली आहेत. यामुळे असे आहे की आपण सोयाबीन च्या दाट पिकात सुद्धा योग्य दाबाने आणि योग्य पद्धतीने फवारणी करू शकतो. या यंत्राने आपण एक सारखी फवारणी करू शकतो ज्यामुळे सोयाबीन पिकावर अळी नष्ट होते. पिकांवरील अळी नष्ट करण्यासाठी  हे  एक  सारखे फवारणी करणारे यंत्र खूप परिणामकारक आहे.परखडे यांनी केलेले तयार हे यंत्र ट्रॅक्टर चा उपयोग करून पिकांचे डवरण सुद्धा करता येते आणि यामुळे पिकांना चांगल्या  प्रकारात  आणि मूलभूत प्रमाणात ऑक्सिजन सुद्धा मिळतो. या यंत्राद्वारे पिकाचे कोणत्याच प्रकारे नुकसान देखील होत नाही आणि पिकांची योग्य प्रमाणात वाढ होते, त्यामुळे हे यंत्र  खूप  फायदेशीर  आहे.

हेही वाचा :अमेरिकन लष्करी अळीचा मका पिकावर प्रादुर्भाव, महागडी औषधे जरी फवारली तरी सुद्धा शेतकऱ्याच्या पदरी अपयश

या यंत्राद्वारे जेव्हा व्यक्ती कीटकनाशकाची फवारणी करतो त्यावेळी तो व्यक्ती कीटकनाशकाच्या कसलाच संपर्कात येत नाही आणि  त्यामुळे  व्यक्तीला  विषबाधा  सुद्धा  होत  नाही.  दिलेश परखडे यांनी आपल्या घरी फवारणीचे द्रावण तयार करण्यासाठी २०० लिटर ड्रम चा वापर केला आहे.या ड्रम ला त्यांनी बाभूळगाव येथील वेल्डिंग च्या दुकानात जाऊन वेल्डिंग सुद्धा करून घेतले आहे जे की त्याच्या दोन्ही बाजूने त्यांनी अडजेस होणारा लांब पाईप सुद्धा लावलेला आहे आणि त्याला ११ नोजल दिले आहेत आणि यामुळे आपण एकाच वेळी २ ओळीत चांगल्या प्रकारे फवारणी करू शकतो. या यंत्राद्वारे आपण तूर पिकामध्ये सुद्धा ९ फूट उंचीवर चांगल्या प्रकारे फवारणी करू शकतो

अनेक लोक शेतीमध्ये पिकावर फवारणी करताना हॅन्ड पंप चा वापर करतात त्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करताना काही व्यक्तींना  यामुळे  विषबाधा सुद्धा होते. या विषबाधेतुन  काही लोक आजारी सुद्धा पडतात तर काही लोकांचा मृत्यू सुद्धा होतो, आणि हेच सर्व टाळण्यासाठी दिलेश परखडे यांनी स्वतः हे जुगाड करून यंत्र तयार केले आहे. हे यंत्र  तयार करण्यासाठी परखडे याना २० हजार रुपये खर्च आला आहे. परखडे यांच्या आसपासच्या परिसरातील शेतकरी वर्ग त्यांना फवारणी साठी बोलवत आहे.

English Summary: This farmer made his own jugaad spray machine for only 20,000, spraying one acre of farm in just 20 minutes
Published on: 07 September 2021, 07:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)