वीज कर्मचाऱ्यांचा संप हि चिगळण्याच्या मार्गावर असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संपावर ठाम राहण्याचा निर्धार विज कर्मचाऱ्यांनी केला आहे. जर या वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत लवकर तोडगा निघाला नाही तर संपूर्ण राज्य येत्या दोन ते तीन दिवसात अंधारात जाऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. काल पहिल्या दिवशी वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक भागात वीज गुल झाली होती आणि वरूनउकाडा असल्याने नागरिकांची चांगलीच लाही लाही झाली.
ऊर्जा मंत्र्यांचे आवाहन कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद नाही
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल वीज कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते व कामगार संघटनांना बैठकीसाठी देखील बोलावले होते. परंतु ठोस असे आश्वासन मिळत नसल्यामुळे संघटनांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आव्हानाला ही प्रतिसाद दिला नाही व आजची बैठक ही त्यामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांनी कडक पावले उचलत संपात सहभागी होणार्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच विविध कर्मचाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. वरून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये दोनच दिवस पुरेल एवढा कोळसा उपलब्ध असल्याची माहिती खुद्द राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. वीजनिर्मिती आणि कोळसा पुरवठा करणारे अनेक केंद्रांवर संघटनांनी संपात सहभागी झाल्यामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडणार आहे.
एक नजर कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर
1- केंद्र सरकारने विद्युत् विधेयक 2021 आणले आहे. त्यामुळे राज्यातील सहा जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा डाव आखला जात आहे तो रद्द करावा.
2- राज्यातील 16 शहरांमध्ये महावितरण ऐवजी फ्रॅंचाईजी नेमण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बाबत सत्यता काय आहे ते स्पष्ट करावे.
3- तीस हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीचे संरक्षण द्यावे.
4- तसेच रिक्त जागांवर कंपन्यांनी नोकर भरती करावी.
Published on: 29 March 2022, 12:07 IST