News

आंबा पिकाचा हंगाम नोव्हेंबर महिन्या पासून सुरु होतो. हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाचा परिणाम आंबा फळबागांवर झाला आहे. हवामान विभागाने 5 एप्रिलपासून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. सिंधुदुर्गात मात्र, 4 एप्रिलाच रात्री अवकाळीने हजेरी (Unseasonal Rain) लावली आहे.

Updated on 05 April, 2022 12:17 PM IST

सिंधुदुर्ग : सुरुवातीपासूनच पावसाची अवकृपा राहिली आहे. आंबा पिकाचा हंगाम नोव्हेंबर महिन्या पासून सुरु होतो. हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाचा परिणाम आंबा फळबागांवर झाला आहे. हवामान विभागाने 5 एप्रिलपासून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. सिंधुदुर्गात मात्र, 4 एप्रिलाच रात्री अवकाळीने हजेरी (Unseasonal Rain) लावली आहे.

आंब्याचे पिकाचे नुकसानच

अवकाळी पाऊसाचा आता तोडणीला आलेल्या आंब्यालाही फटका बसत आहे. काढणीला आलेला आंबा आणि कैरी अवस्थेतील आंब्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. गेलायब काही दिवसांपूर्वी आंबा उत्पादक संघाने यंदा केवळ 25 टक्के फळपिक शेतकऱ्यांच्या हाती लागल्याचे सांगितले होते. हंगामाच्या शेवटी आलेल्या अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अवकाळीचे संकट ओढावल्याने आंबा उत्पादकांना आता प्रतिक्षा आहे शासकीय मदतीची.

महत्त्वाच्या बातम्या :
आनंदाची बातमी ! नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान; असा करा अर्ज
मोठी बातमी : बनावट शेतीमालाची विक्री केल्यास आता जेलची हवा खावी लागणार

पुढील काही दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज?

5 एप्रिलपासून राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर बुलडाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अकोला, या जिल्ह्यामंध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कोकण भागात 4 एप्रिल रोजी रात्रीच पावसाला सुरवात झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली आहे.

English Summary: The rest of Surle was deprived of unseasonal rains
Published on: 05 April 2022, 12:17 IST