भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत दि. २ ते ४ मार्च रोजी तीन दिवसीय कृषी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्या दरम्यान स्टार्टअपसह विविध मल्टिनॅशनल कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातच महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी व पशुपालक बांधवांना धेनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा यासाठी धेनू टेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीनेही सहभाग नोंदवला होता. भारतीय कृषी अनुसंधान परिषद ही शेतकर्यांसाठी कृषी तसेच पशुपालकांना क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून देते.
त्यामुळे या कृषी प्रदर्शनातील नावीन्य अभ्यासण्यासाठी पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, केरळसह इतर राज्यातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. दुग्धव्यवसायाच्या आधुनिकीकरणात पंजाब हे राज्य सध्या अग्रेसर असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धेनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानाला जास्त पसंती दिली. धेनू ॲपने शेतकरी व पशुपालकांच्या गरजा लक्षात घेऊन मंच, प्रश्न-उत्तरे, धेनू वार्ता, पशु बाजार, पशु ज्ञान, धेनू एक्स्पर्ट, धेनू दूत, पशु व्यवस्थापन, ट्रेनिंग सेंटर, पशु स्पर्धा, ताज्या घडामोडी, पशु सल्ला, रेफर एंड अर्न, बिझनेस पेज, प्रेरणादायी यशोगाथा, प्रतिसाद अहवाल इत्यादी विभाग हे कृषी व्यावसायिक व पशुपालकांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहेत.
याशिवाय महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उद्योजतेचे दिपकार मशीन विकसित केले आहे. हे दिपकार मशीन शेणापासून पणती निर्मितीचे काम करते. ह्या मशीन मुळे महाराष्ट्रातील कित्तेक महिलांना रोजगाराचे साधन प्राप्त झाले आहे. याच अनुषंगाने इतर राज्यातील महिलांना ही रोजगाराचे स्वरूप प्राप्त व्हावे व त्या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट व्हावी हा या मागचा प्रमुख हेतू आहे.
इकोदीप हे प्रदूषण विरहित व पर्यावरण पूरक उत्पादन असल्याने होळीच्या पार्शभूमीवर मोठ्या संख्येने ग्राहक ईकोदीप खरेदी करत होते. काही ग्राहकांनी तर इकोदीप निर्मितीच्या उद्योगाच्या संधी बाबत चर्चाही केली. तर काही ग्राहकांनी थेट दिपकार मशीनच खरेदी केल्या तर काहींनी दिपकार मशीनची ऑर्डर देऊन मशीन बुक केल्या. लवकरच ईकोदीप निर्मिती उद्योग पंजाब हरियाणा, बिहार राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यात सुरु होणार असून तेथील महिलांना त्याचा होईल अशी कंपनीचे संचालक श्री. संतोष खवळे व प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन पिसाळ यांनी प्रदर्शनादरम्यान व्यक्त केली आहे.
मोगऱ्याची शेती आहे खूपच फायदेशीर, शेतकऱ्यांना होतोय फायदा
दिपकार मशीनची खास वैशिष्ट्ये-
• वापरण्याची पद्धत म्यॅन्युअल.
• मजबूत टिकावू आणि वजनाने हलकी.
• उत्पादकता १००-१२०/- प्रती तास.
ईकोदिपची खास वैशिष्ट्ये-
• आकर्षक मजबूत आणि टिकाऊ.
• पर्यावरण व प्रदूषण विरहित उत्पादन.
• होळी, दिवाळी, लग्न इ. सणासाठी वापर.
• तुळशीला तसेच रोपट्यांना खत म्हणूनही वापर.
ईकोदीप निर्मिती उद्योगाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क- 91302 33557
तरुणीने अभ्यासासोबतच डुकर पालनातून कमवले लाखो रुपये
पशुपालन व दुग्धव्यवसाया संबंधित अधिक माहिती व तंत्रज्ञानासाठी आजच प्ले स्टोअर वरून धेनू ॲप डाऊनलोड करा.
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=LLCRNX
लेखक
श्री.नितीन रा. पिसाळ
प्रकल्प समन्वयक धेनू टेक सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी, पुणे
मो.बा. 8007313597
पुणे बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदार यादी प्रसिद्ध, इच्छुकांची पळापळ
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांनो काळजी घ्या
निळ्या गव्हाच्या शेतीमुळे शेतकरी श्रीमंत, आरोग्यासाठी फायदेशीर
Published on: 16 March 2023, 11:18 IST