News

शेतकरी बंधूना शेतात काम करत असताना साप व इतर अनेक गोष्टींपासून जीवाला धोका असतो. बऱ्याचदा शेतकरी रात्रीच्या वेळी शेत कामासाठी जात असताना त्यांच्यावर वन्यप्राण्यांचादेखील हल्ला होतो.

Updated on 24 May, 2022 11:53 AM IST

शेतकरी बंधूना शेतात काम करत असताना साप व इतर अनेक गोष्टींपासून जीवाला धोका असतो. बऱ्याचदा शेतकरी रात्रीच्या वेळी शेत कामासाठी जात असताना त्यांच्यावर वन्यप्राण्यांचादेखील हल्ला होतो. काही भागात तर वन्यप्राणांच्या वाढत्या हालचालीमुळे तेथील नागरिकांना धोक्याची घंटा आधीच दिली जाते. सध्या नाशिक शहरातील गंगापूर, आळंदी या दोन्ही धरणांपासून जवळ असलेल्या गिरणारे शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांवर बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत.

याच भागात एका शेतमजुरावर बिबट्याने झडप घेतली व त्या शेतमजुराला शेतात फरफटत नेले. अरूण हिरामण गवळी असं या शेतमजूराचे नाव असून या हल्ल्यात त्याने आपला जीव गमावला. या शेतमजुराचा मृतदेह हल्ला होऊन दोन दिवसांनी सोमवारी (दि.२३) ऊसाच्या शेतात दुपारच्या सुमारास आढळून आला. महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात झालेला मनुष्याचा हा दुसरा बळी आहे. बिबट्याचे वाढत्या हल्ल्यामुळे तेथील भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदिवासी शेतमजूर हे मूळचे हरसूल भागातील रहिवाशी आहेत. मात्र ते गिरणारे पंचक्रोशीत रोजंदारीने शेतीच्या कामासाठी मुक्कामी स्थलांतरीत झाले होते. त्याच भागात दोन दिवसांपुर्वी टमाटा मार्केटच्या मागे असलेल्या ऊसाच्या शेतात अरुण गवळी या मजुरावर बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात अरूण यांना आपला जीव गमवावा लागला. अरुण बेपत्ता असल्यामुळे त्यांचा शोध घेतला जात होता. काहींना तर असे वाटले की, ते गावाकडे परतले
असतील.

Petrol, Diesel Price:पेट्रोल डिझेलबाबत ठाकरे सरकारचा ढोंगीपणा उघड;अजूनही किमती आहे तशाच

त्यामुळे त्याच्यासोबत काम करत असलेल्या मजूरांनी तालुका पोलिसांना कळविले नाही. अशी माहिती वनखात्याने दिली आहे. मात्र आज सकाळी दिलीप काशिनाथ थेटे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३५४मधील शेतात निम्म्याहून अधिक प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत तसेच अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला. त्यानंतर तातडीने ही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली.

श्रीलंकाच नाही तर इतर ६९ देशही आहेत कंगाल, या गोष्टी आल्या अंगलट, जाणून घ्या..

माहिती मिळताच पोलीस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी हजार झाले. त्याच्यासोबत काम करणाऱ्या शेतमजुरांनी लगेचच अरुणचा मृतदेह ओळखला. पोलीस व वनविभागाने जागेवर पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविला. या घटनेननंतर संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:
ऐतिहासिक शेतकरी संपाच्या गावात ठरली रणनीती, 7 दिवसाचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा पेटणार आंदोलनाची मशाल

English Summary: The leopard dragged him into the field and killed him; Farmers, be careful
Published on: 24 May 2022, 11:53 IST