महाराष्ट्र ही कृषी व ऋषींची भूमी म्हणून ओळखल्या जाते , या मातीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, गुलाबराव महाराज, यांची ही जन्मभूमी. ग्रामगीताचार्य तुकाराम दादांची , डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची, महात्मा फुलेंची , शाहू महाराजांची कर्मभूमी, महानुभाव महंतांची काशी, रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर, अशा विविध सुसंस्कृतिने नटलेल्या महाराष्ट्राची ओळख संपूर्ण देशात आहे. परंतु काही वर्षांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्याला तमासखोरांचे गालबोट लागले. फार पूर्वी च्या काळात शेतीत उत्पादन झालेल्या शेतमालाचे खळे, दरोडेखोर शेतात येऊन तुटायचे. खळे लुटण्यासाठी मारामारी, लढाया
व्हायच्या , आणि त्याच दरोडेखोरीतून सरदारी, व राजे शाही जन्माला आली.And from that robbery arose chiefdoms, and royal kings. शेतमालाचा हिस्सा लुटून च राजाची वतनदारी सुरू झाली.
कपासीमध्ये कमी फुले आणि फुलगळीच्या समस्या असतील तर हे करा उपाय
शेतीतून तयार झालेल्या धान्याच्या पुंजीवर, राजा- राजाच्या आप - आपसात लढाया सुरू झाल्या .तसाच प्रकार आता शेतकरी, मजुराच्या कष्टाची तिजोरी मुंबई, दिल्लीत, ( विधानसभा व संसदच्या रूपाने) जमा व्हायला लागली, आणि या तिजोरीवर सर्व दरोडेखोर आता तुटून पडायला लागले. अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सुध्दा शेतकरी नेते आहेत का? याचीच आता आम्हाला लाज वाटायला लागली. मंत्रिमंडळाच्या शर्यतीत असणारे हे दोघेही ढोंगी व
नाटकी,तमासखोर अपक्ष आमदार,आहेत. यांना फक्त सत्तेच देणं घेणं आहे. यांनी तर सत्तेत राहूनच शेतकऱ्यांचे जीव घेतले. सत्तेतल्या राजकीय पक्षांना पाठिंबा देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडवील्या?. मोघे शेतकरी नेते कसे झाले ? फुकटच्या बाता मारणारे, व जनतेसाठी राजीनामा देणारे कॅबिनेट मंत्री होण्यासाठी तडफडत नसतात.हे तर जनतेसाठी खिशात राजीनामा घेऊन फिरणारे आता मंत्रिपदासाठी लोभी असल्याचे ते स्वतःच सांगतात. आणि मंत्रीपद मिळण्यासाठी जीवाचा आकांत करतात आणि मंत्री पद मिळण्यासाठी राजकीय पक्षांचे पुन्हा दरवाजे ठोठावने चालू झाले. मंत्रीपद
मिळाले नाही तर सरकार पाडण्याची भाषा बोलतात. सरकारच्या तिजोरीला हजारो कोटी रुपयांचा चुना लावायला निघालेले हे समाजकारणी कसे ? आता समाजकारण नव्हे तर राजकारणाचे लाचार म्हणून जगायला लागले. तर गुहाटी ला जाण्याचे कारण काय होते ? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी च्या सोबत आतापर्यंत राहून संसार थाटला. मी नाही त्यातली, कडी लावा आतली हे धंदे आता या अपक्ष आमदारनी बंद करावे.अपक्ष आमदार म्हणजे सर्व राजकीय पक्षाची मलाई खाण्यासाठी, व जनतेला बेवकू बनवीणारा मोकळा सांड असतो. हे आता नुकत्याच झालेल्या मागील निवडणुकीतून सप्रमाण सिद्ध झालेले आहे. राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती,
राज्यसभेचे सदस्यत्व, विधान परिषदे साठी केलेले मतदान , अपक्ष आमदारांनी निस्वार्थीपणाने फुकट केल्याचे अजून पर्यंत ऐकले नाही. या मतदानामागे यांचे स्वार्थ खूप दडलेले होते. हे सर्व संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. सरकारी तिजोऱ्या चोरण्याचे कुठेही पुरावे मिळत नसतात, ही बाब फक्त जनता समजून घेते व ऐकत असते , जगातल्या एखाद्या तरी चोरा जवळ कधी तरी चोरलेल्या वस्तूच्या, पावत्या सापडल्या काय? असे पैशाने माजलेल्या सांडांना आता आवर घालण्याची वेळ, जनतेवर आलेली आहे. यांना सुद्धा आता राष्ट्रवादी पक्षासारखीच सत्तेतून पैसा व पैशातून
सत्ता दिसत आहे. कोणतेही आमदार जनतेवर उपकार करत नाही, तर सत्तेत असताना सत्तेतून जनतेचे काम करून देणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे. व तहसीलदार हे आमदाराचे व कलेक्टर हे पालकमंत्र्याचे हे P.A. असतात. व सत्तेतले आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढणे हा अतिशय विचित्र धंदा आहे. घटनेद्वारे या देशाचा आमदार, खासदार हाच सत्ताधारी असताना, कलेक्टर या नौकराला निवेदन देण्यासाठी मोर्चा काढतो. यामागे आपल्या दुकानात किती माल आहे, हे तपासण्याचे फक्त हे नाममात्र शडयंत्र आहे. आपलं स्वतःचं दुकान चालविण्यासाठी ही चिल्लर शाही वापरल्या जाते .
हिरव्या गवतात लपून बसलेले शासन तिजोरीवरचे हे दुतोंडी साप आता बाहेर पडत आहेत. सत्तेतल्या पैशाची मस्ती आलेली पाहून आता तरुणांना सुद्धा आमदार खासदार व्हावे अशी इर्षा तयार झाली आहे. शासन तिजोरी लुटणारा दरोडेखोरांची,सत्तेतली भांडणे प्रत्येक जिल्ह्याला काही नवीन नाहीत. आता रवी राणांचे व (सुलभाताई गट ,प्रवीण पोटे पाटील, आनंदराव अडसूळ, हनुमान चालीसा चा उद्धव ठाकरे, अन कॅबिनेट मंत्री पदासाठी) बच्चू कडू, यांचे राजकीय वाद अगोदरही जनतेने पाहिलेले आहे. ही तर फक्त जिल्ह्याच्या राजकारणाच्या वर्चस्वाची लढाई खेळल्या जात आहे,
ही काही नवीन बाब नाही, परंतु सामान्य माणसांनी या चमचेगिरीत लक्ष देण्याची काही आवश्यकता काय?. हे सर्व सत्तेतल्या लुटारूंची भांडणे आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य ओल्या दुष्काळाने होरपळून निघत असताना , त्याची ना शासनाला चिंता, ना कोणाच्या घरी व कोणा गरीबाच्या दिवाळीची काही इतरांना फिकर राहिली नाही. हे लुटारु एकमेकांच्या उरावर बसतील तर जनतेने लक्ष देण्याची गरज काय ? माजलेल्या सांडाच्या कुस्त्या जनतेने फक्त बघावे, यात जनतेचे हितच काय ? मग या वादात जास्त नाद खुबसूरत राहणे नक्कीच धोक्याचे वाटते ?
या अपक्ष आमदारांनी ,अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना,शेतमजुरांना आतापर्यंत बेवकूफ बनविले. जे सरकार शेतकरी विरोधी कायदे वापरतात, व शेतकऱ्यांचे आत्महत्या घडवितात त्यांना यां दोघानी पाठिंबे दिले आहे. तर अमरावती जिल्ह्यातील एक खासदार व चार अपक्ष आमदार व काँग्रेसचे आमदार सुद्धा शेतकरी विरोधी आहेत. यांना सत्तेतून हाकला, असाच खेळ संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. हिंदूंचं नाव घेऊन पोटाची खळगी भरत नाही, तर त्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी बेरोजगारी काढण्यासाठी मोठमोठी कारखानदारी उभी करावी लागते . या लुटारू सत्ताधीशांच्या मागे ,एलसीबी, शासनाने E.D, सी.आय.डी. तपासण्या
लावाव्या. हे मिट्टू सारखे बोलतील व आपोआप यांचे भांडण मीटतील. व यांचे काळे गोरख धंदे, व लपविलेल्या सर्व प्रॉपर्टी बाहेर येतील. या अपक्ष दोघांही आमदाराला संपूर्ण महाराष्ट्र , सौदेबाज नाटकी, व दोघेही राजकारणातील दलाल आहेत, म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आहे. यांनी गेल्या कित्येक वर्षापासून विधानसभेचे प्रतिनिधित्व करून अमरावती जिल्हा शेतकरी आत्महत्तेत अग्रेसर ठेवला. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संघटना संपवण्याचे काम या दोघांनी केले. राष्ट्रसंतांचे तुकडोजी महाराजांचे ,गाडगे बाबांचे फोटो लाऊन, संताची नावे घेऊन व विधान भवनात ढोंगी नाटके
केली, व घरात बसून सौदी बाजी केली.संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला बेवकूफ बनविले. आतापर्यंत शेतकऱ्यांना योग्य रस्ता दाखवण्याचे काम फक्त शेतकरी संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात केले, हे जर स्वतःला शेतकरी नेते समजतात, तर शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावण्याची हिंमत यांनी जनतेसमोर दाखवावी व शेतकरी संघटनेत सामील व्हावे. शासन तिजोरी लुटण्यासाठी यांनी राजकीय पक्ष स्थापन केले आहे. हे शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत तर फक्त शासन तिजोरीचे लुटारु आहेत. शेतकरी व शेतमजुरांचे हिताचे कायदे तयार केल्याशिवाय शेतकरी व शेतमजुरांना सुख, समृद्धी, व आनंद मिळू
शकत नाही. शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा मिळू शकत नाही. हे दोघे ही नेते जनतेला बेवकुब बनविण्याचे फंडे वापरत आहेत. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गेल्या चाळीस वर्षापासून आपल्या रक्ताचे पाणी करत आहेत. आपल्या छातीवर बिल्ला लावून आपल्या प्रपंचाची राख रांगोळी करीत आहेत. जय भीम, जय बळीराजा, जय गुरुदेव, जय वारकरी."येणार आहे- येणार आहे, बळीचे राज्य येणार आहे."
धनंजय पाटील काकडे 9890368058.
कार्याध्यक्ष- शेतकरी संघटना समन्वय राज्य समिती,( महाराष्ट्र राज्य.)
मुक्काम- वडूरा, पोस्ट- शिराळा, तालुका- चांदूरबाजार, जिल्हा- अमरावती.
Published on: 01 November 2022, 05:01 IST