News

धोम, कण्हेर, कोयना व महु हातगेघर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या दालनात उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली.

Updated on 30 August, 2023 10:06 AM IST

धोम, कण्हेर, कोयना व महु हातगेघर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या दालनात उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली.

बैठकीमध्ये शासन स्तरावरुन जमिन वाटपास मान्यता मिळणेऐवजी जिल्हास्तरावर वाटप करणेत यावे. नवीन व अविभाज्य शर्त कमी करणेबाबत परिपत्रकापमाणे कब्जेहक्काच्या रकमेवर जे १२ टक्के व्याज आकारण्यात आले आहे. ते रदद् करण्यात यावे, सातारा जिल्हयात उपलब्ध असलेल्या जमिनी जिल्हा पुर्नवसन अधिकारी यांचे मार्फत वाटप सुरु करावे.

कण्हेर प्रकल्पग्रस्तांना मौजे मंगळवेढा जि.सोलापुर येथे नधु बहिरु शेडगे व विठठ्ल राजाराम काराळे यांना गेली २० वर्षापूर्वी वाटप करण्यात आलेले भुखंड परस्पर दुसऱ्याचे नावे केलेबाबत, मौजे मंगळवेढा जि. सोलापुर येथील कण्हेर प्रकल्पग्रस्त पुर्नवसित शेतकऱ्यांना शासनाने जमीन वाटप केले.

तांदळाच्या किमतीने मोडला रेकॉर्ड, भारत सरकारच्या एक निर्णय आणि जगभरात खळबळ..

मुळ मालक त्यांना वहीवाटीस अडथळा करून कोर्टामध्ये केस दाखल करुन देत असल्याबाबत, कण्हेर प्रकल्पग्रस्त पुर्नवसित गावठाणांना नागरी सुविधा पुरविले जात नसलेबाबत, महु हातगेघर धरणालगत हातगेघर व वहागांव या गावाचे ग्रामस्थ वास्तव करीत असतात त्या गावांना नागरी सुविधेचा लाभ मिळावा, महु हातगेघर प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या पर्यायी जमिनीच्या वहीवाटीस रस्ता नाही मुददामहुन अडथळा केला जातो.

त्यामुळे पुर्नवसनास अडथळा येत आहे. महु हातगेघर धरणग्रस्तांना वाटप झाले आहे. चुकीच्या पध्दीतने बदलीप्रस्ताव करणेत आलेल्या प्रकरणाची चौकशी करुन हे क्षेत्र प्रकल्पग्रस्तांना मिळावे. महु हातगेघर प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीकरीता ६५ टक्के रक्कम कपातीची अंमलबजावणी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग नुसार करणेत यावी.

तांदळाच्या किमतीने मोडला रेकॉर्ड, भारत सरकारच्या एक निर्णय आणि जगभरात खळबळ..

११ पुणे विभागातील सातारा जिल्हामधीन पुनर्वसन अधिनियम लागु नसलेल्या शिल्लक प्रकल्पास्त खातेदारांबाबत कब्जेहक्काच्या रकमेसंबंधित काय कार्यवाही केली? तसेच शिल्लक प्रकल्पग्रस्त खातेदारांचे पुर्नवसन करणेसाठी आपण आपले स्तरावरुन काय उपाय योजना केल्या? यासंदर्भातील विविध विषय चर्चेत घेण्यात आले.

मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सरकारकडून हालचाली, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महत्वाचे आदेश...
सोमेश्वर कारखान्याने ३,५५० रुपये दर द्यावा, जाणीवपूर्वक दोनशे रुपये दर कमी केला- सतीश काकडे
इंदापूरमध्ये लाईट शिवाय चालते मोटार, शेतकऱ्यांचा जुगाड, विजेची होणार बचत....

English Summary: The issue of the project victims will be resolved, a big decision regarding the issue of Dhom, Kanher, Koyna and Mahu Hatgeghar project victims..
Published on: 30 August 2023, 10:06 IST