यावर्षीचा उसाचा गळीत हंगाम काही दिवसांवरच येऊन उभा राहिलेला आहे त्यामुळे जे थकीत FRP ची रक्कमेचा मुद्धा आहे तो पुन्हा समोर येऊन बसलेला आहे. FRP ची रक्कम एकाच खेपेत मिळावी यासाठी शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत.अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये तसेच संबंधित कारखान्याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी म्हणून कारखान्याचा कारभार कसा चालू आहे पाहून कृषी आयुक्तालय कडून मानांकन दिले जाणार आहे.
वर्षभर चर्चा राहते ती गोष्ट म्हणजे FRP रकमेची:
कोणता कारखाना योग्य दर देत आहे तसेच कोणत्या कारखान्याने FRP रक्कम समोर ठेवली आहे हे सर्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आता सर्व माहिती भेटून शेतकरी आता ऊस कारखान्याला ऊस घालतील.प्रत्येक वर्षी उसाचा गाळप हंगाम संपला तरी सुद्धा ज्या गोष्टीची वर्षभर चर्चा राहते ती गोष्ट म्हणजे FRP रकमेची आणि यावेळी सुद्धा याच गोष्टीची शेतकऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे आणि आंदोलने चालू आहेत.जे की FRP रक्कम अदा जो पर्यंत करत नाहीत तो पर्यंत साखर कारखाना ला ऊस दिला जाणार नाही अशी महत्वाची भूमिका शेतकऱ्यांनी हाती घेतलेली आहे. उसाचा वाढीव दर देऊ असे आमिष कारखान्यांनी शेतकऱ्यांना दाखवले आणि ऊस मिळवला.
हेही वाचा:शेतकऱ्यांनी दिली २७ सप्टेंबरला भारत बंदची हाक, हरियाणा मधील बाजार समित्या राहणार बंद
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील खाजगी तसेच सरकारी कारखान्यांना मानांकन जाहीर केले आहे त्यामुळे कारखान्याचा कारभार कसा चालू आहे ते सर्व समोर येणार आहे आणि यावरच शेतकऱ्यांना असे ठरवता येईल की कोणत्या कारखान्याला ऊस घालायचा आणि कोणत्या कारखान्याला ऊस घालायचा नाही.राज्यातील १९० कारखान्यांना मानांकन देण्यात येणार आहे त्यामध्ये ५७ कारखाने असे आहेत जे शेतकऱ्यांना वेळोवेळी पैसे देतात आणि ४४ असे कारखाने आहेत जे शेतकरी वर्गाची फसवणूक करत आहेत.
शेतकऱ्यांनाच्या तक्रारींचे स्वरूप काय:-
शेतकऱ्यांनी कारखान्यावर ऊस घालावा म्हणून कारखाने शेतकऱ्यांना पहिल्यांदा एक रकमी पैसे देत होते मात्र नंतर शेवटच्या कालावधीत त्यांनी पैसे देणे थांबवले तसेच ऊस घालावा म्हणून शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याची आमिष दाखवले आणि नंतर आहे तीच रक्कम जाहीर केले.ज्यावेळी शेतकरी पैसे मागायला जायचे त्यावेळी ते पुढील भविष्यात असे असे प्लॅन आहेत त्यासाठी पैसे लागणार आहेत असे सांगून हात हालवी करायचे अशा अनेक तक्रारी साखर आयुक्तालायकडे आलेल्या आहेत.
हेही वाचा:या योजनेअंतर्गत बळीराजाला मिळणार 40,000 रुपये जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ
शेतकऱ्यांनाच करता येणार कारखान्याची पारख:-
राज्यात असे १९० साखर कारखाने आहेत त्यामधील काही कारखाने चोख व्यवहार करतात तर काही कारखाने शेतकऱ्यांची फसवणूक करतात.आता या साखर कारखान्याना मानांकन जाहीर केले असल्याने आपल्याला साखर कारखान्याचे खरे स्वरूप समजणार आहे आणि यावरून शेतकरी कोणत्या कारखान्याला ऊस घालणार आणि कोणत्या नाही ते ठरवतील आणि शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही.
Published on: 27 September 2021, 06:25 IST