News

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. पावसाने असे काही रौद्र रूप धारण केले की यात आर्थिक नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झाली. मात्र या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांच्याच नशिबी आला आहे.

Updated on 18 July, 2022 5:51 PM IST

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. पावसाने असे काही रौद्र रूप धारण केले की यात आर्थिक नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झाली. मात्र या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांच्याच नशिबी आला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे बरेच नुकसान झाले तर काही भागात दुबार,तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

नांदेड जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीही नेतेमंडळी मदतीला धावून आले नसल्याने शेतकरी संतापले. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नुकसानीची पाहणी करण्यासाठी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर गेले असता शेतकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.

शेतकऱ्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडीओ च्या माध्यमातून असे समोर आले की, आमदार जितेश अंतापुरकर हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देगलूर तालुक्यातील एका गावात गेले. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी अंतापुरकर यांना घेरले आणि त्यांना गावातील समस्यांचा पाढाच वाचून दाखचवला. एवढंच नाही तर गरज असल्यावर फोन केला असता अंतापुरकर यांनी फोन उचलला नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

धक्कादायक! रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना झाली विषबाधा; एकाचा मृत्यू

'आम्ही संकटांचा सामना करत असताना तुम्हाला आता आमची आठवण आली का'? अशा प्रश्नावरून गावकऱ्यांनी अंतापुरकर यांना खडसावले. प्रश्नांची सरबत्ती चालू असताना आमदारांनी तेथून काढता पाय घेतल्याची घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:
महाबळेश्वरला जात असाल तर थांबा! महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी, 16 गावांचे स्थलांतर
गोगलगायीने वाढवले शेतकऱ्यांचे टेन्शन; पाहणी करण्यासाठी माजी मंत्री थेट शेतीबांधावर

English Summary: The farmers asked the MLA for an answer
Published on: 18 July 2022, 05:51 IST