News

शेतकरी आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकास अगदी पोटाच्या मुलासारखा जीव लावत असतो. त्याला एकच चिंता असते की आपल्या शेतातील पीक कुठल्याही कारणाने खराब होऊ नये. शेती करणारे शेतकरी खते,पाणी,रोग-कीड याबाबत कायम चिंताग्रस्त असतात.

Updated on 31 March, 2022 6:18 PM IST

शेतकरी आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकास अगदी पोटाच्या मुलासारखा जीव लावत असतो. त्याला एकच चिंता असते की आपल्या शेतातील पीक कुठल्याही कारणाने खराब होऊ नये. शेती करणारे शेतकरी खते,पाणी,रोग-कीड याबाबत कायम चिंताग्रस्त असतात.

यापेक्षाही आणखी एक मोठी समस्या आहे, जी अनेकदा शेतकऱ्यांना त्रास देते, ती समस्या म्हणजेच रानडुक्कर, माकडे किंवा वन्य प्राण्यांनी त्यांच्या शेतात प्रवेश करू नये आणि शेत आणि पिकांची नासधूस करू नये. वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते यामुळे शेतकरी बांधव वेगवेगळ्या उपाययोजना करतो. मात्र शेतकरी आपल्या शेतात सतत पहारा देऊ शकत नाहीत, त्यामुळे जेव्हा शेतात कोणी नसतं वन्य प्राणी शेतात घुसतात आणि पिकाची नासाडी करतात.

याच समस्येने त्रस्त झालेल्या तेलंगणातील एका शेतकऱ्याने डुक्कर, माकडे किंवा वन्य प्राण्यांपासून पीक वाचवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. होय, या शेतकऱ्याने शेतातील पिकाचे रक्षण करण्यासाठी अस्वलाला कामावर ठेवले आहे.  हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण ही गोष्ट अगदी खरी आहे, चला तर मग तुम्हाला जाणुन घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

क्रॉप गार्ड अर्थात पिकांचे रक्षण करणारे अस्वल

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पिकांचे रक्षण करणारे हे अस्वल खरे नसून, अस्वलाचा पोशाख परिधान केलेला एक व्यक्ती आहे. दररोज शेताचे रक्षण करण्यासाठी या माणसाला शेतकऱ्याने कामावर ठेवले आहे. एएनआय यांच्या एका बातमीनुसार, तेलंगणातील सिद्धीपेट येथे राहणारे भास्कर रेड्डी या शेतकऱ्याने माकडे आणि रानडुकरांपासून त्यांच्या शेतीचे व पिकांचे संरक्षण करण्यासाठी एका माणसाला कामावर ठेवले आहे विशेष म्हणजे या माणसाला या शेतकऱ्याने अस्वलाचा पोशाख परिधान करायला सांगितले आहे.

पंधरा हजार रुपये पगाराने शेती सांभाळण्यासाठी आहे माणूस 

भास्कर रेड्डी सांगतात की, ते एका व्यक्तीला अस्वलचा पोशाख परिधान करून फिरायला सांगतात, शेतात फिरण्यासाठी या माणसाला दररोज 500 रुपये रोज दिला जातो. या कामाबद्दल सोशल मीडियावर लोक आपापली मते मांडत आहेत. काही लोक या कामाला गमतीदार म्हणत आहेत, तर अनेक लोक या कल्पनेचे खूप कौतुक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:-

  1. अहमदनगरच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! जिल्हा बँकेने कर्जाची मर्यादा वाढवली; आता मिळणार एवढे कर्ज
  2. मानलं भावा! 'या' अवलिया शेतकऱ्याने उसात घेतले कलिंगडचे आंतरपीक; आंतरपिकातून कमवतोय लाखों
English Summary: The farmer kept the bear to keep the land; Bear Salary too
Published on: 31 March 2022, 06:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)