News

महाराष्ट्रातील हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सामान्य जनतेसाठी खुला झाला आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार असल्याचा दावा केला जातो. हा केवळ महामार्ग नसून महाराष्ट्राच्या विकासात एक गेम चेंजर सिद्ध होणार असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Updated on 12 December, 2022 7:30 PM IST

महाराष्ट्रातील  हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सामान्य जनतेसाठी खुला झाला आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार असल्याचा दावा केला जातो. हा केवळ महामार्ग नसून महाराष्ट्राच्या विकासात एक गेम चेंजर सिद्ध होणार असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

नक्की वाचा:2000 रुपयांची नोट म्हणजे काळा पैसा; मोदींची 2 हजारांची नोट बंद करण्याची मागणी

समृद्धी महामार्गामुळे कृषी 17 ला एक नाव संजीवनी मिळण्याचा देखील दावा या माध्यमातून केला जात आहे. कारण या महामार्गामुळे जवळजवळ महाराष्ट्रातील 14 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार असल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा निर्माण होतील व कृषी मालाची वाहतूक करणे सहज शक्य होणार आहे.दरम्यान या महामार्गालगत 20 नवनगर स्थापित केली जाणार आहेत.

या नवनगरांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेतला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूसंचयित केल्या जाणार आहेत. या नवनगरात कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी होणार आहे. आता महामार्ग झाला असून समृद्धी केंद्र बनवण्यासाठी हालचाली देखील तेच झाल्या आहेत.महामार्गालगत असलेल्या धामणगाव शहराच्या आसपास असलेल्या चार गावांमधील दोन हजार हेक्टर शेतजमीन भूसंंचयित केले जाणार आहे. हे कृषी समृद्धी केंद्र 1000 ते 1200 एकर क्षेत्रावर उभारले जातील.

यात निवासी क्षेत्रासह कृषी आधारित उद्योग, उत्पादन व व्यावसायिक केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.यासाठी उपयोगात आणले जाणाऱ्यां 5% जमीनवर सार्वजनिक वापर राहणार आहे, 20% जमीन अंतर्गत रस्त्यांसाठी, पंधरा टक्के जमीन व्यावसायिक क्षेत्राला, दहा टक्के जमिनी ग्रीन झोन म्हणून राहणार आहे तर नेहमी जमीन ही निवासी म्हणून उपयोगात आणली जाणार आहे. दरम्यान आता या शेतजमिनीसाठी भूसंचयनाला वेग येणार आहे.

नक्की वाचा:मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या कारखान्यांना बिनव्याजी मदत

धामणगाव शहराजवळील दत्तापूर , नारंगावडी, जळगाव, आर्वी , आसेगाव या गावांमधील दोन हजार हेक्टर शेतजमीन यासाठी ताब्यात घेतले जाणारा असून ही प्रक्रिया येत्या जानेवारीत म्हणजे नववर्षात संचयित केली जाणार आहे. या नवनगराचे दत्तापूर असे नामकरण करण्यात येणार आहे.या नगराची लोकसंख्या जवळपास एक लाखच्या आसपास राहणार आहे.

येत्या तीन वर्षात या नवनगर आवश्यक सुविधा आणि उद्योगांची उभारणी होणार आहे. या नवनगरात जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात संबंधित जमीनदारांना प्रति वर्ष मोबदला मिळणार आहे.जिरायती जमिनीला प्रति वर्ष 75000, बागायती जमिनीला एक लाख बारा हजार पाचशे, आणि हंगामी बागायती जमिनीला प्रति वर्ष दीड लाख असा मोबदला मिळणार आहे.

राहता तालुक्यातील सावळी विहीर आणि कोपरगाव या ठिकाणीदेखील कृषी समृद्धी केंद्राची उभारणी होणार असून पुढील वर्षी या ठिकाणी देखील जमिनीचा ताबा याच पद्धतीने घेतला जाणार आहे.या ठिकाणी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याच प्रमाणात मोबदला मिळण्याची आशा आहे. निश्चितच समृद्धी महामार्ग महाराष्ट्रात समृद्धी आणण्यासाठी आता सज्ज होत आहे.

नक्की वाचा:110 कारखान्यांनी दिली नाही एकरकमी एफआरपी, सरकारचे लक्ष आहे का?

English Summary: the built up 20 navanagar around samruddhi express way so get benifit to agriculture sector
Published on: 12 December 2022, 07:30 IST