राज्यात गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवडीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. पाच हेक्टरच्या आतील व जॉब कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मधून फळबाग लागवड केली जात आहे.
यंदा मात्र पावसाळ्या आधीच राज्यातील कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे. राज्यात ९०५३ कृषी सहायक असून प्रती कृषी सहायकांना इतर क्षेत्र निश्चित करण्यात आलेले असून या वर्षाभरामध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत अधिक फळबाग लागतो कृषी विभागाने नियोजन केले आहे. गेल्या वर्षी ज्या जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले त्या जिल्ह्यात काही अंशी यंदा उद्दिष्ट वाढवण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) यंदा सलग तिसऱ्या वर्षी वर्षभरात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट केले आहे. गेल्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या १८ जिल्ह्यांसह उद्दिष्टाच्या सर्वाधिक २२३ टक्के लागवड पूर्ण करणाऱ्या गोंदिया जिल्ह्याचे विशेष कौतुक केले आहे.
आता जयंत पाटील हाजीर हो! राष्ट्रवादीला मोठा धक्का
पाच हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या किंवा जॉब कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी राबविण्यात येत असलेली स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कोरोनाच्या काळात बंद होती. ती योजनाही गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात फळबाग लागवडीला वेग येताना दिसून येत आहे.
ब्रेकिंग! ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता! सत्ता संघर्षाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने..
रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक प्रत्येकी ४ चार हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार आहे. हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, बीड, कोल्हापूर या जिल्ह्यांत मात्र फळबाग लागवडीचे उद्दिष्ट अत्यंत कमी आहे. अर्ज मागवणे, खड्डे खोदणे, लागवड व इतर सर्व बाबींचे नियोजनही निश्चित करण्यात आले आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, राजेंद्र पवार यांचा पुढाकार
कृषी जागरणकडून करिअर सक्षमीकरणासाठी 'विंग्स टू करिअर' उपक्रम सुरू
केळी उत्पादकांना मिळणार 50 टक्के अनुदान, या सरकारचा मोठा निर्णय
Published on: 12 May 2023, 11:27 IST