News

अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच आपला ऊस पेटवला असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत करमाळा तालुक्यातील उमरड येथील शेतकऱ्याने ऊस पेटवून का दिला जातो याची कथाच मांडली आहे. त्यांनी स्वत: 5 एकरातील ऊसाला काडी लावली आहे.

Updated on 31 March, 2022 3:53 PM IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सध्या गळीत हंगाम संपत आला तरी त्यांच्या उसाला अजून तोड आली नाही. अजूनही राज्यात २० टक्के ऊस शेतातच आहे. यामुळे आपला ऊस घालवण्यासाठी अनेकांची पळापळ सुरु आहे. या हंगामात ऊस पेटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे या घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे.

असे असताना मात्र अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच आपला ऊस पेटवला असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत (Karmala) करमाळा तालुक्यातील उमरड येथील शेतकऱ्याने ऊस पेटवून का दिला जातो याची कथाच मांडली आहे. त्यांनी स्वत: 5 एकरातील ऊसाला काडी लावली आहे. यामुळे आता या शेतकऱ्याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

ऊस पेटवल्यानंतर अवघ्या काही वेळात (Sugar Factory) साखर कारखान्याची तोड येऊन ऊस गाळपाला घेऊन गेली. मात्र, वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाचा सांभाळ करुन अखेर शेतकऱ्यालाच तो जाळून टाकावा लागण्याने शेतकऱ्यांच्या मनाला किती वेदना होत असतील याचा विचार न केलेलाच बरा. अनेक शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती सध्या आली आहे.

कालावधी होऊन गेलेला ऊसा वावराबाहेर काढायचा तरी कसा म्हणून शेतकरी आता थेट फड पेटवून देऊ लागले आहेत. मात्र ऊस फडातून बाहेर निघत असला तरी शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान होणार आहे. करमाळा तालुक्यातील उमरड येथील काशिनाथ देवकते हे साखर कारखान्याचे सभासद असून त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली होती. यामुळे हतबल होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

उसाला लगेच तोड हवी असेल तर ऊसच पेटवून द्या असा सल्ला ऊसतोड कामगारांनी काशिनाथ देवकते यांना दिला. त्यामुळे काशिनाथ दवकते यांनी फडातल्या उभ्या ऊसाला काडी लावली. असे असले तरी जळालेला ऊस तोडण्यासाठी देखील शेतकऱ्यास पैशाची मागणी केली जाते. यामुळे आता ऊस पेटवला तरी नुकसान होणारच आहे.

महत्वाच्या बातम्या; 
काय सांगता! या आंब्याची किंमत आहे तब्बल 2.7 लाख रुपये, सुरक्षेसाठी आहेत 9 श्वान आणि 3 सुरक्षा रक्षक
आता शेतकऱ्यांचे टेन्शन मिटले, आता जाणार नाही शेतातील वीज, सरकारचा मोठा निर्णय..
शेतकऱ्यांनो खिशातले पैसे नका खर्च करू, आता शेतीसाठी उपकरणे खरेदी करायला सरकार देतंय अनुदान

English Summary: The action taken by the farmer by placing a stone on his heart, the factory soon broke the sugarcane.
Published on: 31 March 2022, 03:53 IST