यवतमाळ जिल्ह्यात अवैध सावकारांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून घेतल्याची प्रकरणे आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात म्हणून नव्या कायद्यासाठी संघर्ष केला.
अनेकांच्या अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. त्यातून निर्माण झालेल्या नव्या सावकारी अधिनियमाची माहिती शेतकऱ्यांना देऊन सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी दाखल करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यामध्ये आता बाभूळगाव तालुक्यातील एरंडगाव आणि वडगाव येथील राजेंद्र वानखडे आणि संजय गावंडे या सावकारग्रस्त शेतकऱ्यांची अवैध सावकारीत हडपलेली जमीन जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाने गुरुवारी या शेतकऱ्यांना ताब्यात दिली गेली. यामुळे त्यांना दिलासा मिळाला.
शेतीसाठी सरकार करणार मदत, 15 लाखांची करणार मदत, असा करा अर्ज..
यामुळे जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना सावकारी पाशात गेलेली त्यांची हक्काची जमीन परत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो आहे. अवैध सावकारीमध्ये जमीन गमावल्यामुळे गेल्या २० वर्षांपासून न्यायासाठी झगडणाऱ्या राजेंद्र वानखडे आणि संजय गावंडे यांना यंदा त्यांची हक्काची जमीन परत मिळाली आहे.
माॅन्सूनची वाट रखडली, शेतकरी चिंतेत...
दरम्यान, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आ. विद्या चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. यामुळे आता शेतकरी सुखावला आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे जमिनी हडप केल्या जातात.
पावसाच्या अंदाज चुकला, राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला, २३ जूनपासून सक्रिय होण्याची शक्यता
जांभळाने शेतकऱ्यांना केलंय मालामाल! एक जांभूळ दहा रुपयाला, किलोचा दर चारशे रुपयांवर..
येत्या आठवड्याभरात ऊसदर नियंत्रण समिती स्थापन करू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
Published on: 16 June 2023, 01:54 IST