सध्या जर आपण जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर तेलबिया आणि वनस्पती तेलाच्या वाढत्या जागतिक किमतींमध्ये,कृषी खर्च आणि किमती आयोगाने पिक विधी करण्याला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तेलबिया पिकांची लागवड करावी असे देखील आयोगाने म्हटले आहे.
यासंबंधी आयोगाने 8 जून 2022 ला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, जागतिक चलनवाढीला संरचनात्मक धोका निर्माण झाला असून भारताच्या कृषी आहेत त्यापैकी जवळपास अर्धा वाटा व्हेजिटेबल तेलाचा आहे.
त्यामुळे भारताला शेतमालाचे आयात करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. यासंबंधी आयोगाने केलेल्या अभ्यासादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा असे दिसून आले की, बहुतांशी शेतकरी असे होते की ते हवामान जरी अनुकूल नसले तरी भात आणि गहू पिकवायचे. तांदूळ आणि गव्हासाठी सरकारने दिलेल्या एम एस पी मुळेया दोन्ही पिकांची लागवड खूप प्रमाणात वाढली असे देखील आयोगाने अहवालात नमूद केले आहे.
नक्की वाचा:थायलंडमध्ये गांज्याच्या लागवडीला आणि विक्रीला मान्यता, मान्यता देणारा पहिलाच देश
विशेषता पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये तांदूळ आणि गहू लागवडीखालील क्षेत्र खूप वाढले आहे. परंतु त्या तुलनेत कडधान्य, मका आणि बाजरी या पिकांच्या क्षेत्रांमध्ये खूप प्रमाणात घट झाली. जर आपण 1980 81 मधील 17.5 टक्क्यांवरून 2019-20 मध्ये 40.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
मक्या च्या वाटा 5.6 टक्क्यांवरून 1.4टक्के,बाजरीचा वाटा एक टक्क्यांवरुन 0.3 टक्क्यांवर आला आहे. त्यापेक्षा बिकट स्थिती कडधान्य पिकांची असून कडधान्य याच कालावधीमध्ये पाच टक्क्यांवरून घसरून 0.5 टक्क्यांवर आणि तेलबिया पिकांची लागवड त्याच कालावधीत 3.7 टक्क्यांवरून 0.6 अत्यंत वाढले.
नक्की वाचा:सोयाबीनचे ३७ हजार क्विंटल बियाणे चाचणीत नापास
आंध्र आणि झारखंडच्या शेतकऱ्यांना कॉर्न पिकवण्याचा सल्ला
CACP द्वारे वेगवेगळ्या राज्यांसाठी विश्लेषण केले गेले असून त्या आधारावर ती राज्य पिकविविधता आणू शकता.यानुसार जर विचार केला तर आंध्र प्रदेश आणि झारखंडमधील शेतकऱ्यांना कॉर्न ची लागवड करण्यास सांगितले गेले आहे.याचा त्यांना फायदा होईल.
त्याचबरोबर बिहार राज्यांमध्ये मका, सूर्यफूल आणि मूग या पिकांची लागवड करावी शिफारस करण्यात आली असून उत्तर प्रदेश राज्यात बाजरी, मका, तुर, भुईमूग आणि पश्चिम बंगालमध्ये मुग लागवडीची शिफारस करण्यात आली आहे.
या सगळ्या गोष्टी केल्या नंतर देखील प्रोत्साहन नंतर देखील पिक विविधतेचे क्षेत्र वाढत नाही. पंजाब आणि हरियाणा मध्ये विशेष करून प्रवचनाच्या माध्यमातून पिक वैविध्य त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत परंतु केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन असून देखील या भागांमध्ये पीक विविधीकरण आता फारशी प्रगती झालेली नाही. त्यामागे कारणे आहेत की, CACPने सांगितलेल्या काही पर्याय पिकांपासून कमी परतावा आणि उच्च जोखीम,खात्रीशीर विपणन आणि फायदेशीर किमतीचा अभाव आणि पर्यायी पिकासाठी योग्यतंत्रज्ञानाची अनुपलब्धता यांचा समावेश आहे.
Published on: 11 June 2022, 10:08 IST