News

Supriya Sule: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांकडे राज्य सरकारचे लक्ष नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

Updated on 21 October, 2022 2:16 PM IST

Supriya Sule: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतकरी अडचणीत आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांकडे राज्य सरकारचे लक्ष नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. 

सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सध्या पुरंदर (Purandar) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी देखील त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर (State Govt) सडकून टीका देखील केली आहे.

राज्य आणि केंद्र सरकारला सामान्यांचं काही घेणं देणं नाही. आमच्या शेतकऱ्यांकडे ना झाडी, ना हॉटेल, ना 50 खोके असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर कोणीही जात नसल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! सोने 6000 रुपयांनी स्वस्त...

पुरंदर तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी पांगारे गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांची (Farmers) भेटही घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनाही जाणून घेतल्या.

सुप्रिया सुळे यांनी राऊतवाडी या ठिकाणी हरणी ते मुरती या रस्त्याचे भूमिपूजन केले. त्यावेळी त्यांनी लोकसभेआधीच विधानसभा निवडणूका लागतील असे वक्तव्य केले आहे.

दिलासादायक! दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल डिझेल स्वस्त; पहा किती रुपयांनी झाले स्वस्त

सरकारचे दिवाळी गिफ्ट पोहोचले नाही. कारण त्यांना पाहिजे असणारे फोटो त्यावर लागले पाहिजेत. एक वेळ माणूस उपाशी राहिला तरी चालेल पण फोटो लागला पाहिजे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर कडवी टीका केली आहे.

ही दिवाळी आपल्यासाठी गोड नाही. एवढा पाऊस झाला की, आपली दिवाळी गोड झाली नाही. सरकारला विनंती आहे तुम्ही सगळं बाजूला ठेवा, ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:
मानलं भावा! जर्मनीतील लाखोंची नोकरी सोडून पिकवतोय वाटाणा; शेतीतून करतोय करोडोंची उलाढाल
चार दिवसानंतरही पीएम किसानचे पैसे आले नाहीत? त्वरित येथे करा कॉल, मिळतील पैसे

English Summary: Supriya Sule: Farmers have no bush, no hotel, no 50 boxes; Supriya Sule's challenge to the government
Published on: 21 October 2022, 02:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)