News

पुणे : गेल्या वर्षी ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गळीत हंगाम खूप दिवस लांबला होता. राज्यात दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापासून हंगामाला सुरुवात केली जाते. मात्र, या वर्षी १ ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरु झाला आहे.

Updated on 28 October, 2022 10:40 AM IST

पुणे : गेल्या वर्षी ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गळीत हंगाम खूप दिवस लांबला होता. राज्यात दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापासून हंगामाला सुरुवात केली जाते. मात्र, या वर्षी १ ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरु झाला आहे.

पावसाने यंदा ऊस गाळपास उशीर होणार आहे. यांदरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने १० नोव्हेंबरदरम्यान आपल्या पूर्ण क्षमतेने ऊस गाळप सुरू करतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: ब्रेकिंग: कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

आतापर्यंत ७३ कारखान्यांनी गळीत हंगामासाठीची परवानगी घेतली आहे. तर गेल्या वर्षीच्या २०० साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदा २०३ कारखाने गळीत हंगामात सहभाग घेतील अशी शक्यता आहे. राज्यातील ऊस उत्पादन २०२१-२२ या हंगामातील १,३२१ लाख टनाच्या तुलनेत १,३४३ लाख टनापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

हेही वाचा: या बाजारसमितीत कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा भाव

साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या १३७ लाख टनाच्या तुलनेत वाढून १३८ लाख टन होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्राने गेल्या हंगामात उत्तर प्रदेशला पाठीमागे टाकले होते.

चालू हंगामातही साखर उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राहील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र साखर उत्पादन आणि निर्यात यामध्ये जगातील अनेक साखर उत्पादक देशांपेक्षा पुढे आहे.

हेही वाचा: परतीच्या पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले! जाणून घ्या आजचे भाज्यांचे दर...

English Summary: Sugarcane will be crushed at full capacity in the state from November 10
Published on: 28 October 2022, 10:40 IST