आपण बघितले की मागील गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे ऊस शिक्कल राहिले. तसेच जास्तीचे पैसे द्यावे लागले. यामुळे ऊस अनेकांना परवडला नाही. यामुळे आता शेतकरी ऊस लावणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले असताना येणारा गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season) हा वाढीव ऊस क्षेत्राचा असणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत उपग्रह प्रतिमांचा अंदाज, विविध साखर कारखान्यांच्या ऊस क्षेत्राच्या (Sugarcane Acreage) नोंदी आणि सध्या पडणारा पाऊस यांच्या एकत्रित अहवालानुसार येणारा हंगाम हा जादा उसासह अतिरिक्त साखर उत्पादनाचा (Excess Sugar Production) असेल अशी शक्यता आहे. यामुळे यावर्षी देखील आपला ऊस तोडला जाणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
दरम्यान याबाबतची आकडेवारीच सर्व काही सांगणार आहे. गेल्या वर्षी देशात ५५.८३ लाख हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले. येत्या हंगामात ५८.२८ लाख हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. यामुळे यंदा कारखाने देखील लवकरच सुरु होतील असा अंदाज आहे. तसा तसा निर्णय देखील सरकाने घेतला आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) वतीने उपग्रह प्रतिमांचा अंदाज घेऊन येणाऱ्या गळीत हंगामाबाबत नियोजन करण्यात आले.
'नंदी ब्लोअर' ची कमाल, आता ट्रॅक्टरचे काम बैलजोडीच्या माध्यमातून, अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा..
याबाबत बैठकीत विविध राज्यांच्या ऊस क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. यामध्ये देशभरातील साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उसाचे क्षेत्र, अपेक्षित उत्पन्न, मागील आणि सध्या नोंदणीचे क्षेत्रीय अहवाल, सध्याचा व संभाव्य पाऊस या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे कारखाना यंत्रणेला सज्ज राहावे लागणार आहे.
राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, शिंदे सरकारची मोठी घोषणा
दरम्यान, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात गेल्या वर्षी १३.५० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता, यंदा त्यात वाढ होऊन उसाचे क्षेत्र १४.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे यंत्रणेवर लोड येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह इतर ऊस उत्पादक राज्यांची देखील उसाची लागवड वाढली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरातचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या;
सहकार मंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
अजब गजब कारभार! ग्राहकाला आले तब्बल 3419 कोटींचे वीजबिल, आकडा ऐकून ग्राहक रुग्णालयात
काय सांगता! खोदलेली विहीर गेली चोरीला, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार...
Published on: 27 July 2022, 02:01 IST