News

पश्चिम महाराष्ट्रात तर यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. असे असताना एका कारखान्याची राज्यात चर्चा आहे. हा कारखाना तब्बल 4 टर्मपासून बिनविरोध होत आहे. माढा तालुक्यातील पडसाळीच्या श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना असे या कारखान्याचे नाव आहे. सलग चौथ्या वेळेस या साखर कारखान्याची निवडणुक ही बिनविरोध झाली आहे.

Updated on 12 June, 2022 10:43 AM IST

एखादा साखर कारखाना ताब्यात ठेवणे म्हणजे खूप अवघड काम आहे, अनेकजण कारखान्यावर निवडून जाण्यासाठी आपले सगळे आयुष्य खर्ची घालतात. अनेकांना यामध्ये यश मिळते तर काहींना यश मिळत नाही. कारखान्याचा चेअरमन होण्यासाठी तर आमदार सुद्धा प्रयत्नशील असतात. पश्चिम महाराष्ट्रात तर यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. असे असताना एका कारखान्याची राज्यात चर्चा आहे. हा कारखाना तब्बल 4 टर्मपासून बिनविरोध होत आहे.

माढा तालुक्यातील पडसाळीच्या श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना असे या कारखान्याचे नाव आहे. सलग चौथ्या वेळेस या साखर कारखान्याची निवडणुक ही बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या 17 संचालकांच्या जागेसाठी 17 जणांचेच अर्ज आणि छाननीच्या दिवशी निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अर्जाची तपासणी केले असता सर्व अर्ज वैध ठरले. यामुळे या कारखान्याची सध्या चर्चा सुरु आहे.

एकीकडे संचालक पदासाठी अनेकजण अनेकवर्ष तयारी करत असतात, मात्र या कारखान्याच्या लोकांनी आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. या कारखान्यावर पुन्हा चेअरमन पदी माजी आ. धनाजीराव साठे यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पडसाळीचा श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याची निवडणुक ही बिनविरोध होत आहे. याला कारणही तसेच आहे. कारखान्याचे चेअरमन माजी आ. धनाजी साठे यांनी शेतकऱ्यांचे ऊस बील देण्यासाठी चक्क स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवली जात होती.

मोफत रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

यामुळे लोकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा देण्यासाठी ते कधी मागे पुढे बघत नाहीत. स्व. विलासराव देशमुख आणि धनाजीराव साठे हे जवळचे मित्र होते. त्यांच्या सहकार्यातून हा कारखाना उभा राहिला आहे. 2005 पासून या कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध होत आहे. यंदा चौथ्यावेळीही निवडणुक बिनविरोधच झाली आहे. यामुळे केवळ पैसे घालवून निडणूक जिंकणे महत्वाचे नसून हा कारखाना आणि येथील नेतेमंडळींनी एक एक आदर्श निर्माण केला आहे.

महत्वाच्या बातम्या;
कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश, पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली..
न्यूझीलंड सरकारचा निर्णय, गुरांनी ढेकर दिल्यावर मालकांना भरावा लागणार कर, कारणही आले समोर...
आता डासांचे टेन्शन मिटले, बाजारात आला नवीन बल्ब, डास मारण्यासाठी ठरतोय वरदान

English Summary: Sugar factory unopposed for 4 terms, a different ideal created in the state ..
Published on: 12 June 2022, 10:43 IST