यंदाचा ऊस तोडणी हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यावर आरोप केले आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड ठराविक मंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत चुकीची असल्याचा आरोपही रायते यांनी केला आहे.
१५ ऑक्टोबरपूर्वी साखर कारखाने सुरू करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे साखर आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. मागील गळीत हंगाम संपत आला तरी अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीची पैसे मिळालेली नाहीत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला हवे होते, असे पांडुरंग रायते म्हणाले होते.
चांगल्या आरोग्यासाठी तुळशीच्या बिया उत्तम; अनेक आजारांपासून करतात बचाव, जाणून घ्या...
मात्र, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या हंगामात अनेक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याकडे गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचेही रायते म्हणाले.
साखर आयुक्त शेखर गायकवाड हे मंत्र्यांच्या सूचनेनुसार काम करतात. ते नियमांच्या चौकटीत राहून काम करत नसल्याचा आरोपही पांडुरंग रायते यांनी केला आहे. साखर कारखाना सुरू करण्याच्या तारखेत बदल करण्यामागील नेमके कारण आयुक्तांनी जाहीर करावेत. अशी मागणी पांडुरंग रायते यांनी केली आहे.
शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज उपलब्ध
Published on: 02 October 2022, 02:08 IST