News

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी अचानक केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांची राज्यसभा कारकीर्द संपत आली असल्याने राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली याचा तपशील अजून समोर आला नाही.

Updated on 07 July, 2022 3:15 PM IST

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी अचानक केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांची राज्यसभा कारकीर्द संपत आली असल्याने राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली याचा तपशील अजून समोर आला नाही.

याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. असे असताना नक्वी यांच्या पुढील राजकीय घडामोडींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले होते. मात्र राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने (BJP) नक्वी यांना उमेदवारी दिली नव्हती. यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात होते.

पक्षाकडून त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल, असे म्हटले जात होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नक्वी हे राज्यसभेचे उपनेतेही आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश आणि जनतेच्या सेवेतील नक्वी आणि आरसीपी सिंग यांच्या योगदानाचे कौतुक केले. नक्वी हे केंद्र सरकारमध्ये अल्पसंख्याक व्यवहार मंत्री होते. सध्या पक्ष त्यांना एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार किंवा मोठ्या राज्याचे राज्यपाल बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 लाख देणारच! शेतकऱ्यांसाठी 15 लाखांची घोषणा..

दरम्यान, 1998 मध्ये रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मुस्लिम चेहरा संसदेत पोहोचला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्रीही होते. आता त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
गोपीचंद पडळकरांना मंत्री करा!! कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्ताने लिहिले पत्र
तरुणांनो संधीचे करा सोनं! रेल्वेत कोणतीही परीक्षा न देता थेट मेगाभरती...
शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज

English Summary: Sudden resignation of BJP's Union Minister, sparks discussions
Published on: 07 July 2022, 03:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)