News

Natural Farming : सध्या हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. या बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. सातत्यानं खतांच्या बियाणांच्या किंमती वाढत आहेत. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतीतून नफा मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याचं आवाहन हरियाणा सरकारनं केलं आहे.

Updated on 25 December, 2022 2:12 PM IST

Natural Farming : सध्या हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. या बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. सातत्यानं खतांच्या बियाणांच्या किंमती वाढत आहेत. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतीतून नफा मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याचं आवाहन हरियाणा सरकारनं केलं आहे.

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देशी गायींच्या खरेदीवर 25 हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री जे पी दलाल (Jai Parkash Dalal) यांनी दिली.

काल (23 डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाचे कृषीमंत्री जे पी दलाल यांनी शेतकऱ्यांना गायीच्या खरेदीसाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. किमान आपल्या उपजीविकेसाठी तरी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन मंत्री दलाल यांनी केलं आहे.

आधार कार्डधारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी! आजच करा हे काम नाहीतर...

शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत जागरूक करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण यांच्याकडून विविध सत्रांचेही आयोजन करण्यात येत आहे. मार्गदर्शनाबरोबरच आर्थिक मदतही केली जाणार असल्याचे दलाल म्हणाले.

7th Pay Commission: ठरलं तर! जाणून घ्या - 18 महिन्यांचा थकबाकीचा DA कधी येणार!

चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सार इथे शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना हरियाणाचे कृषी मंत्री जेपी दलाल म्हणाले की, मत्स्यपालन व्यवसायातून 10 हजार शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

काही काळापासून हिरव्या चाऱ्याचा देखील तुटवडा आहे. त्यासाठी सायलेजचा व्यवसाय करण्यासाठी 50 लाखांपर्यंतच्या आर्थिक मदतीचीही तरतूद करण्यात आल्याची माहिती जे पी दलाल यांनी दिली आहे.

English Summary: Subsidy will be given to organic farmers
Published on: 25 December 2022, 02:12 IST