अॅग्रो केमिकल फेडरेशन ऑफ इंडियाचे महासंचालक डॉ. कल्याण गोस्वामी यांनी आज कृषी जागरणच्या केजे चौपाल अधिवेशनाला आज भेट दिली. कृषी जागरणतर्फे पुष्पगुछ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी जागरणचे मुख्य संपादक एम सी डॉमिनिक, संचालक शायनी डॉमिनिक तसेच इतर टीम सदस्य आणि सोबतच कृषी जागरणचा कृषी पत्रकार वर्गदेखील उपस्थित होता.
कल्याण गोस्वामी यांनी रॅनबॅक्सी प्रयोगशाळेत संशोधन वैज्ञानिक म्हणून स्वतःच करिअर सुरु केल. बायोटेक रिसर्चमध्ये काही काळ काम केल्यानंतर प्रशासन, सरकारी व्यवहार, धोरण हस्तक्षेप, कौशल्य विकास,इ. गोष्टींकडे ते वळाले. कृषी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी कृषी क्षेत्रातील समस्यांबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. रासायनिक खतांचा तसेच कीटनाशकांचा वापराबाबत शेतकऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे.
याचा अतिवापर जमिनीची सुपीकता आणि उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले.शिवाय ऑफिसमध्ये टाय घालून ए. सी. ची हवा घेत शेती करता येत नाही. त्यासाठी प्रत्येक्षात शेतीत उतरावेच लागते. तेव्हाच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेता येईल. माझ्यासाठी शेतकरी हा देवासमान आहे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, ज्याचा उद्देश रासायनिक खते, रोग आणि कीटकनाशकांचा वापर न करता निरोगी हवामान आणि उत्पादक, शाश्वत माती आणि पर्यावरण संरक्षण तयार करणे असा आहे.
शेतकऱ्यांसाठी कोणतीही पॉलिसी तयार करताना त्यामध्ये प्रत्येक्षात शेतकऱ्यांचा समावेश असावा. ज्यांची नाळ मातीशी जुळली अशांना या प्रक्रियेत समाविष्ट करणे गरजेचे आहे. शेतीमध्ये त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना खतांवर आणि कीटकनाशकांवर अनुदान दिल्यास अधिक फायदा होईल असं मतंही त्यांनी मांडले.
शेतकऱ्यांनी शेतीपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. शेतीत मातीचे परीक्षण करणे ही महत्वाची बाब आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच सरकारने आता शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यावे आणि त्यांना शेतीतून अधिक नफा कसा होईल यासाठी उपाययोजना आखाव्यात. कृषी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अधिकाधिक शेतकरी वर्गासाठी काम करण्याची तयारी ठेवावी कारण कर्मासारखी दुसरी कोणतीही पवित्र गोष्ट नाही. चांगले कर्म करत रहा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाचे खत घेण्याची सक्ती; कृषी विभाग करणार का कारवाई?
कांदा उत्पादकांसाठी अच्छे दिन, केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Published on: 12 July 2022, 06:01 IST