News

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतीविषयक संशोधनाची माहिती घेतली. बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, व शैक्षणिक संकुल येथेही भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत अनेक कृषी अधिकारी देखील हजर होते.

Updated on 31 July, 2023 10:42 AM IST

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतीविषयक संशोधनाची माहिती घेतली. बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, व शैक्षणिक संकुल येथेही भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत अनेक कृषी अधिकारी देखील हजर होते.

यावेळी मुंडे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे लोकप्रिय आमदार मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यातील कण्हेरी गावात कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेली फळरोपवाटिका राज्यातच नव्हे तर सबंध देशात सुंदर व आदर्श आहे. आज या फळरोप वाटिकेस मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील यांच्यासह भेट देऊन पाहणी केली.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने बारामती तालुक्यात आयोजित आरोग्य वारी अभियान अंतर्गत अयोजित 100 कि.मी. रिले रन स्पर्धेच्या सांगता सोहळ्यासही उपस्थित राहिलो.

राज्यात आता खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये, राज्य सरकारचा निर्णय...

या दौऱ्यात बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, व शैक्षणिक संकुल येथेही भेट देऊन प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात येत असलेल्या शेतीविषयक संशोधनाची माहिती घेतली. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रासही भेट दिली व तेथील उपक्रमांची माहिती घेतली.

भारतातील या राज्यात सर्वाधिक महाग टोमॅटो विकला जातोय, तोडले सगळे रेकॉर्ड..

अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असलेले संशोधन याबाबत माहिती जाणून घेतली. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात शाश्वत शेती कशी करावी व कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवावे या दृष्टीने ही रोपवाटिका व कृषी विकास प्रतिष्ठाणचे कार्य आदर्शवत आहे.

लवंगाची शेती आहे खूपच फायदेशीर, जाणून घ्या..

English Summary: State Agriculture Minister Dhananjay Munde was impressed by the agricultural research in Baramati, said, Baramati is the ideal in the country.
Published on: 31 July 2023, 10:42 IST