सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यात बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी सोयाबीन आणि तूर आणि हरभऱ्याचेही दर घसरले होते. शेतात अमाप कष्ट घेऊनही उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्याचे सगळे आर्थिक गणित विस्कळीत होते. आणि सध्या शेतमालाला बाजारपेठेत मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र गेल्या काही चार दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात बरीच वाढ झाली आहे.
हे दर तब्बल 400 रुपायांनी वाढले आहेत. प्रक्रिया उद्योजकांकडून याची मागणी वाढत होती त्यामुळेच हा बदल झाल्याचे सांगितले जात आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात हा बदल झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 400 रुपयांची वाढ झाल्याने सोयाबीन उत्पादकांना आता चांगलाच फायदा होणार आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सोयाबीनला 6 हजार 800 असा भाव मिळत होता. दरम्यान सोयाबीन चे 7 हजार रुपये क्विंटल भाव कमी होऊन थेट 6 हजारांवर आले होते.
त्यामुळे साठवलेल्या व उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र बाजारपेठेत झालेला बदल आता सोयाबीन उत्पादकांसाठी फायदेशीर ठरत आहे. चार दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर 6 हजार 400 रुपयांवर होते मात्र आता तेच दर गुरुवारी 6 हजार 800 रुपयांवर आला आहे. केंद्र सरकारने मध्यंतरी सोयापेंडची आयात केली होती परिणामी दरात मोठी घसरण झाली होती. सोयाबीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता अशातच त्याच्या दरात वाढ झाली त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
बातमी कामाची: राज्य सरकारने घेतला कृषीबाबत मोठा निर्णय; आता कृषी मालाला मिळेल योग्य भाव
एकीकडे सोयाबीनच्या दरात वाढ झाली असली तरी हरभरा आणि तुरीच्या बाबतीत कोणताच बदल करण्यात आला नाही. राज्यातील हरभरा खरेदी केंद्र बंद केल्यामुळे खुल्या बाजारपेठेशिवाय कोणताच पर्याय नाही. सध्या तुरीला 6 हजार 300 हमीभाव असला तरी बाजारपेठेत याचा दर 6 हजार इतका आहे. खरिपामुळे आवक घटली आहे. तरीही दरात कोणताच बदल झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या:
केळी उत्पादकांना दिलासा! उत्पादनात घट झाल्याने केळीच्या दरात मोठी वाढ
शेतकऱ्यांनी केली एकी आणि त्यांचे दिवसच बदलेले; कांद्याच्या भावात अशी काही वाढ झाली की...
Published on: 10 June 2022, 03:10 IST