बाजारात सध्या ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर मिळत आहे. माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हणमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. बाजार आवारात शेतीमालास चांगला दर मिळत आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी चांगला दर मिळेल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली.
दरम्यान, ज्वारीची आवक माण, दहिवडी या तालुक्यांतून आहे. बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यांतून शेतीमालाची आवक होते. समितीने आवारात शेतीमाल आल्यानंतर प्रथम वजनानंतर लिलाव अशी सुविधा असल्याने लगेच पेमेंट मिळत आहे.
साखरेचे भाव वाढण्याचा अंदाज, कारण..
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बारामती बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन सचिव अरविंद जगताप केले. मुख्य बाजार आवारात ग्रेडिंग मशिन असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी आणखी एक नवीन मशिन बसविण्याचा समितीचा मानस आहे.
राज्यात मोठा दुष्काळ पडणार? मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस
शेतकऱ्याचा शेतीमाल कमी वेळेत जादा स्वच्छ होईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल. याठिकाणी दोन वेगवेगळ्या बाजार समित्या असल्याने जास्त ताण येत नाही.
तुमच्या बागेत ही पाच झाडे लावा, तुमच्या घराची हवा पूर्णपणे करतील स्वच्छ
३५ हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत, 6 लाखांचे बिल काढण्यासाठी केली होती पैशांची मागणी...
कोंबड्या आणि शेळीसाठीही कर्ज मिळणार, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
Published on: 13 July 2023, 10:03 IST