News

आपल्याला माहित आहेस की प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही आर्थिक बाबीशी संबंधित किंवा अन्य गोष्टींमध्ये बदल होत असतो. ज्याचा आपल्या जीवनाशी थेट संबंध येतो. आजपासून ऑगस्ट महिन्याचे सुरुवात झाली आणि सरकारने काही गोष्टींमध्ये बदल केला व काही गोष्टींची आज मुदत देखील संपली. त्याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

Updated on 01 August, 2022 11:09 AM IST

आपल्याला माहित आहेस की प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही आर्थिक बाबीशी संबंधित किंवा अन्य गोष्टींमध्ये बदल होत असतो. ज्याचा आपल्या जीवनाशी थेट संबंध येतो. आजपासून ऑगस्ट महिन्याचे सुरुवात झाली आणि सरकारने काही गोष्टींमध्ये बदल केला व काही गोष्टींची आज मुदत देखील संपली. त्याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

 व्यावसायिक गॅसच्या किमती

 आजपासून व्यवसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये 36 रुपयांनी कपात करण्यात आली असून मुंबईमध्ये 19 किलोचा व्यवसायिक सिलेंडर 1936.50 रुपयांना मिळणार आहे.

नक्की वाचा:Peteol-Disel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता,कंपन्यांनी दिले त्या प्रकारचे संकेत

एचडीएफसीच्या होम लोन व्याजदरात वाढ

 देशातील सर्वात महत्त्वाचे आणि मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने होमलोनच्या व्याजदरात वाढ केली असून या बँकेने शनिवारी रिटेल प्राईम लेंडिंग रेट  वाढवला आहे. हे वाढलेले दर आज एक ऑगस्टपासून लागू केले आहेत.

 बँक ऑफ बडोदाच्या काही नियमात बदल

 बँक ऑफ बडोदाने देखील बँकेच्या ग्राहकांसाठी एक बदल केला असून एक ऑगस्टपासून चेकने पैसे देण्याच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. जर या बाबतीत रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला तर त्यानुसार पाच लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक साठी  पॉझिटिव पे सिस्टम लागू करण्यात आली आहे.

म्हणजे आता बँकेला चेकच्या संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप द्वारे द्यावी लागणार आहे.

नक्की वाचा:Petrol Diesel Rates: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल डिझेलचे नवीन दर; जाणून घ्या आजचे दर

आज पासून या बाबींची संपली मुदत

1- पीएम किसान केवायसी- पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या केवायसी साठी जी 31 जुलै ची वेळ देण्यात आली होती ते संपली असून आज पासून शेतकऱ्यांना केवायसी करता येणार नाही.

2- पंतप्रधान पिक विमा योजना नोंदणी- पीएमएफबीवाय अर्थात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 जुलै होती.

म्हणजे आजपासून तुम्हाला या योजनेसाठी नोंदणी करता येणार नाही.

3- आयटीआर वर लागेल दंड- 31 जुलै आयटीआय करण्यासाठी चा शेवटचा दिवस होता. म्हणजेच आजपासून जर तुम्हाला आयटीआर भरायचा असेल तर त्यावर तुम्हाला लेट फी द्यावी लागणार आहे.

आयकर दात्याचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपये किंवा त्याहून कमी असेल तर त्याला विलंब शुल्क एक हजार रुपये आणि जर करपात्र उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर विलंब शुल्क पाच हजार रुपये भरावे लागणार आहे.

नक्की वाचा:Common People: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार हे 'पाच' बदल

English Summary: some rule change from today and limit over of some scheme
Published on: 01 August 2022, 11:09 IST