News

सोलापूर-शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक सोबतच विविध कार्यकारी सोसायटी यांचा मोलाचा सहभाग असतो. शेतकऱ्यांनाशेतीच्या

Updated on 31 March, 2022 7:52 AM IST

 सोलापूर-शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक सोबतच विविध कार्यकारी सोसायटी यांचा मोलाचा सहभाग असतो. 

शेतकऱ्यांनाशेतीच्या कामासाठी आवश्यक म्हणून पीक कर्ज देण्यात येते परंतु पिकांचे उत्पादन हाती येऊन देखील कर्ज परतफेड शेतकरी करीत नाहीत. हीच परिस्थितीऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील आहे.

नक्की वाचा:पिके आणि फळबागेसाठी माती परीक्षण करायचे असेल तर अशा पद्धतीने घ्यावा मातीचा नमुना; वाचा आणि घ्या जाणून

त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना संबंधित शेतकऱ्याला आता हमीपत्र द्यावे लागणार आहे. म्हणजेसंबंधित शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला गेल्यानंतरऊस बिलातून कर्जाची रक्कम वसूल करण्यास शेतकऱ्याची कोणतीही हरकत नाहीये अशा स्वरूपाचे हे हमीपत्र असणार आहे.जिल्हा बँकेला शंभर वर्षांची परंपरा आहे.तरीदेखील बँक आर्थिक अडचणी मध्ये सापडलीआणि त्या वेळच्या सरकारच्या काळात बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला

चालू परिस्थितीत बँकेची स्थिती हळूहळू सुधारू लागले असून अनुत्पादित कर्जाचे वसुलीही झाली आहे.परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या कडील कर्जाची वसुली अपेक्षेपेक्षा कमीच आहे.

नक्की वाचा:तुरीचे वाण निवडताना जमिनीचा पोत पाहून निवड करणे ठरेल फायदेशीर; तेव्हाच मिळेल जास्त उत्पादन

तरीहीशेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करून जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र वाढवण्याच्या कामात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोठा वाटा राहिला आहे. कारखान्यांना देखील मुबलक प्रमाणात उसाचा पुरवठा होत आहे. परंतु हे जे चक्र आहे ते व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर कारखानदारांनी त्यांच्याकडे ऊस आणणाऱ्या शेतकऱ्यांकडील बँकेच्या कर्जाची वसुली होण्यासाठी मदत करणे बँकेला अपेक्षित आहे. अजूनहीसोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांत बँकेला चांगले सहकार्य करत आहेत 

परंतुबाकीच्या कारखान्यांकडून अजूनही बँकेला कमी-अधिक प्रमाणात मदत होत आहे.बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता मुदत संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा संचालक मंडळ अस्तित्वात येईल.अशावेळी बँकेची आर्थिक स्थिती पूर्वीप्रमाणे सुस्थितीत असावी, शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याची सवय लागावी या दृष्टीने कारखानदारांनी बँकेला मदत करायला हवी.

English Summary: solapur district bank take decision about farmer loan that guarantee letter must for loan
Published on: 31 March 2022, 07:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)