एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून ही कंपनी पॉलिसाच्या संदर्भात वेगवेगळे प्लॅन बाजारात आणत असतात. जेव्हा विमा पॉलिसीचे नाव येते तेव्हा एलआयसीवर लोकांचा पहिला विश्वास असतो. या लेखामध्ये एलआयसीच्या एका प्लॅन बद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.
या पॉलिसीची खास गोष्ट अशी आहे की, यात आपणास संरक्षण आणि बचत दोघेही मिळतात, सेवा निवृत्तीनंतर आपल्याला ७४ हजार ३०० रुपये वार्षिक पेन्शनचा लाभ आयुष्यभर मिळत असतो. एलआयसीची ही योजना फारच लोकप्रिय आहे. या पॉलिसीचे नाव आहे, जीवन शांती. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकल प्रीमियम वार्षिक योजना आहे.
हेही वाचा :एलआयसीची जीवन अक्षय योजना- एक हप्ता जमा करा आणि जीवनभर चार हजार रुपये पेन्शन मिळवा
या योजनेमुळे तुम्ही एका वेळेस मोठ्या रकमेची गुंतवणूक करू शकता. त्यानंतर एलआयसीचा या पॉलिसीमध्ये ठराविक आशा अनिश्चित कालावधीसाठी तुम्हाला आजीवन पैसे मिळतात. तुम्ही या पॉलिसीचा फायदा मासिक, त्रै -मासिक, सहामाई आणि वार्षिक रूपात मिळू शकता.
या पॉलिसीमुळे कर्ज घेता येते This policy allows you to take out a loan
एलआयसीचे बरेच फायदे आहेत. जसे एलआयसी आपल्या भविष्याचे संरक्षण करीत नाही तर अडचणीच्या क्षणी जर आपल्याला अचानक पैशांची गरज पडली तर आपण आपल्या घेतलेल्या पॉलिसीवर कर्जरूपाने पैसे घेऊ शकतो. पॉलिसीवर वैयक्तिक कर्ज घेताना आपल्याला त्या पॉलिसीचे मूल्य जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. जेव्हा पॉलिसीचा काळ पूर्ण होतो, तेव्हा पॉलिसीचे सरेंडर व्हॅल्यू आपल्याला मिळते.
संपूर्ण सरेंडर मूल्य किमान ३ वर्षासाठी जमा केलेल्या पॉलिसी वरच उपलब्ध आहे. एलआयसीचे नियमानुसार जर तुम्ही दीर्घकालीन कालावधीसाठी पॉलिसी घेतली असेल तर त्या दरम्यान तुम्हाला बोनसही मिळतो. हे बोनसचे रक्कम जोडल्यानंतर त्याची रक्कम वाढते. आपण जवळजवळ ९० टक्के सरेंडर व्हॅल्यू वैयक्तिक कर्ज म्हणून घेऊ शकता.
Published on: 06 January 2021, 04:47 IST