Sugarcane Bill: सध्या राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील साखर कारखाने सुरु आहेत मात्र ऊस तोडणीचे काम अद्यापही संपले नाही. पंढरपूर तालुक्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
सत्ताधारी चेअरमन भगीरथ भालके यांच्या गटाने निवडणुकीच्या निमित्ताने विचारविनिमय करण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये एका शेतकऱ्याने ऊसाचे बिल मागितले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. उसाच्या बिलाचा प्रश्न उपस्थित करताच व्यासपीठावरील कार्यकर्ते शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेले आणि धक्काबुक्की केली.
निवडणुकीच्या संदर्भात विचार करण्यासाठी पंढरपुरातील रात्री दाते मंगल कार्यालयात श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद यांची बैठक आयोजित केली होती. रोपळे येथे राहणारे शेतकरी जगन भोसले यांनी उसाच्या बिलाची मागणी केली होती.
मोठ्या मनाची कोंबडी; भर वादळात दिला मांजरीच्या पिल्लांना आसरा
बैठकीत शेतकरी जगन भोसले यांनी माईक वर येऊन, अनेक वेळा चेअरमन भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्याकडे उसाच्या बिलाची मागणी केली मात्र अजूनही मला उसाचे बिल मिळाले नाही. शिवाय या विषयावर कोणीच बोलायला तयार नसल्याची व्यथा या शेतकऱ्याने सर्वांसमोर मांडली.
त्यामुळे चिडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी जगन भोसले यांना व्यासपीठावर जाऊन धक्काबुक्की केली. हा संतापजनक प्रकार श्री विठ्ठल साखर कारखानाच्या प्रमुख लोकांसमोरच झाल्याने काही काळ तिथे तणावाचे वातावरण तयार झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
टोमॅटोची लाली कायम; ''उत्पादकांना अच्छे दिन", टोमॅटो दरात वाढ
भाजपच्या मैदानात राष्ट्रवादीची बाजी! सुनील आण्णांनी नाचून केला आनंद व्यक्त
Published on: 03 June 2022, 04:22 IST