Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून भाजप (BJP) वारंवार सरकार कोसळण्याचे भाकीत करत होते. तसेच भाजप पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करणार असे सांगण्यात येत होते. भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेतील एका गटासोबत युती करत सत्ता स्थापन केल्याचे अख्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारबाबत एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जयंत पाटील यांना मध्यवर्ती निवडणूक लागल्यास राष्ट्रवादी किती तयार आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार (Eknath Shinde) पडणारच!” असे भाकीत त्यांनी केले आहे.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजप आणि शिंदे गटाला त तितकंस सोपं जाणार नाही. कारण लोकांना स्वज्वळ, प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय लागली आहे. त्या लोकांचा सध्या अपेक्षा भंग झाला आहे.
पाच वर्ष आम्ही सक्षम विरोधीपक्षाची भूमिका बजावतो. “2024 ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्ते येतो, असं भाजपने म्हटलं असतं तरी लोकांनी त्यांना स्विकारलं असतं. पण आता महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील” असेही पाटील म्हणाले आहेत.
संकटाची मालिका संपेना! पावसातून सावरताच पिकांवर कीड आणि रोगांचे सावट; शेतकरी चिंतेत...
जयंत पाटील यांनी बोलताना सरकारवर आरोप देखील केले आहेत. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असं वाटत नाही. शिंदेगटालील आमदारांचं पुढच्या टर्मला निवडूण येणं कठीण आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
PM Kisan: सावधान! उरले फक्त 2 दिवस; करा हे काम अन्यथा मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे
Banana Price: केळीच्या दरात मोठी घसरण! गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर भाववाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा..
Published on: 28 August 2022, 05:43 IST