Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Govt) सत्ता स्थापन केली आहे. राज्यात जरी नवीन सरकार आले असले तरी ते तुम्हाला शॉक देण्याच्या तयारीत आहे. कारण लवकरच राज्यात वीज दरात वाढ (Electricity price hike) केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात वीज दरात दरवाढ केली तर पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वीजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या (Fuel adjustment charges) दरात (Electricity bill) पुन्हा एकदा 60 ते 70 पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
देशात अगोदरच महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे अगोदरच सर्वसामान्य नागरिक दरवाढीमुळे हैराण झाले आहेत. त्यातच आता शिंदे सरकार पुन्हा वीज दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा टाकण्याच्या तयारीत आहे.
Kharif Season: वरुणराजाची हुलकावणी! सुरुवातीला धो धो बरसला ऐनवेळी मारली दांडी; खरीप पिके संकटात
राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते.
तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे.
LIC ची खास योजना! मुलीच्या लग्नावर मिळणार 27 लाख रुपये
आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आह. महानिर्मितीकडून वीज खरेदी दरात वाढ झाल्यामुळे इंधन समायोजन शुल्कावर त्याचे परिणाम झाले आहे, मात्र तूर्तास अशी ही दरवाढ होणार नाही, सध्याचे इंधन समायोजन शुल्क नोव्हेंबरपर्यंत लागू होणार आहे, अशी माहिती महावितरणचे वाणिज्य संचालक डॉ. मुरहरी केळे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांना अलर्ट जारी
मोठी बातमी! संजय राऊतांबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय...
Published on: 05 September 2022, 05:16 IST