News

देशात कोरोना संसर्गाचं संकट असताना पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडल्या. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अशी स्थिती असताना खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली.

Updated on 18 May, 2021 10:47 PM IST

देशात कोरोना संसर्गाचं संकट असताना पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडल्या. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अशी स्थिती असताना खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली.  कोरोना काळात शेतकऱ्यांचे काम जरी चालू असले तरी त्यांना परडवतं किंवा त्यांची अबादानी असते असं नाही.

हेही वाचा : रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, दर कमी करण्यासाठी कृषीमंत्र्यांचे केंद्र सरकारला पत्र

यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त करत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संबंधित खात्याचे केंद्रीय केमीकल आणि फर्टिलाइजर मंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.

 

खरीप हंगाम दारात असतानाच खतांमध्ये दरवाढ करण्याच्या दुर्दैवी निर्णयामुळे उत्पादन शुल्क आणि शेतीवर मोठा विपरीत परिणाम होईल. टाळेबंदीने मार्केटचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन, इंधन दरवाढ अशा संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. केंद्राचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा,’ अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

English Summary: Sharad Pawar writes letter to Sadanand Gowda against fertilizer price hike
Published on: 18 May 2021, 10:00 IST