News

सरकार बदलताच एक मोठी बातमी समोर आली आहे. आता भारतीय कुस्ती संघटनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

Updated on 02 July, 2022 12:17 PM IST

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकार पडले असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी शपथ घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली. आता सरकार बदलताच एक मोठी बातमी समोर आली आहे. आता भारतीय कुस्ती संघटनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात संदीप भोंडवे यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यावर पवारांची अजून प्रतिक्रिया आली नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात काही आरोप करण्यात आले होते. खासगी कंपनीसोबत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा करारनामा करुन तो लपवणे सभासदांना अंधारात ठेवत शासनाकडून 42 लाख 18 हजार अनुदान घेतल्याचे म्हटले आहे.

तसेच संबंधित प्रकरणात भारतीय महासंघाकडून आलेला आदेश डावलणे, वार्षिक सर्वसाधाण सभेत गोंधळनं, सभा स्थगित झाल्याचे भासवने, खोटे प्रोसिडिंग लिहून सर्व विषयांना मंजुरू दाखवणे पैलवानांना आर्थिक दृष्टया फायदेशीर स्पर्धा बंद करणं, असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. यामुळे आता याची चौकशीची शक्यता आहे. मात्र सरकार बदलताच हा निर्णय झाल्यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे.

शेतकऱ्याच्या मुलाचा जगात गाजावाजा! फेसबुकवर मिळवली करोडोच्या पॅकेजची नोकरी

दरम्यान, यामध्ये राजकारण आणले जात आहे. शरद पवारसाहेब यांच्यावर आमचा अजिबात आक्षेप नाही. शरद पवार यांनी कुस्ती परिषदेत अतिशय चांगले काम केले असल्याचे तक्रारदार संदीप भोंडवे म्हणाले. असे असताना मात्र, मागील अनेक दिवसांपासून शरद पवार याचे नाव वापरुन कुठतरी बाळासाहेब लांडगे कुस्तीत भ्रष्टाचार करत होते असा आरोप भोंडवे यांनी केला आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मगरीने मित्रासमोर तरुणाला गिळले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पहा फोटो

ज्यावेळी एखाद्या खेळाला एखादी कंपनी प्रायोजक असते, त्यावेळी त्या स्पर्धेचा खर्च ती कंपनी करत असते. मात्र, बाळासाहेब लांडगे यांनी राज्य कुस्तीगिर परिषदेला अंधारात ठेवून 42 लाख रुपये महाराष्ट्र शासनाकडून स्पर्धेला अनुदान म्हणून घेतले, असेही भोंडवे यावेळी म्हणाले. यामुळे यामध्ये काहीतरी होतंय असे त्यांनी सांगितले, यामुळे आता कोनाकोणाची चौकशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
धेनू अँप मधील पशुव्यवस्थापन विभाग ठरतोय पशुपालकांचा फॅमिली डॉक्टर, शेतकऱ्यांना दिलासा
आता राष्ट्रवादीही?? धनंजय मुंडेंनी रात्री घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
मला प्रेमपत्र आलंय!! शरद पवार असे का म्हणाले..? वाचा सविस्तर

English Summary: Sharad Pawar! Pawar was the president when the government changed Council dismissed
Published on: 02 July 2022, 12:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)