News

राज्यात आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी यवतमाळ व सांगलीतील मौजे पेठ (ता. वाळवा) येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (Food Technology Colleges) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ग्रामीण भागात अन्नतंत्रज्ञ, तज्ज्ञ प्रशिक्षक, अन्न निरीक्षक व कृषी मदतनीस निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगास चालना मिळणार आहे.

Updated on 11 September, 2018 9:05 PM IST

राज्यात आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी यवतमाळ व सांगलीतील मौजे पेठ (ता. वाळवा) येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (Food Technology Colleges) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ग्रामीण भागात अन्नतंत्रज्ञ, तज्ज्ञ प्रशिक्षक, अन्न निरीक्षक व कृषी मदतनीस निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगास चालना मिळणार आहे.

संबंधित बातमी वाचण्यासाठी: सांगली आणि यवतमाळमध्ये सुरु होणार फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालय : कृषिमंत्री चंद्रकांत पाटील

आजच्या निर्णयानुसार यवतमाळ येथे शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील मौजे पेठ येथे क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहेत. या महाविद्यालयांची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष 40 इतकी असणार आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीने निश्चित केल्याप्रमाणे शिक्षकवर्गीय 47 पदे आणि शिक्षकेत्तर 83 पदे अशी एकूण 130 पदे तत्त्वत: मंजूर करण्यात आली आहेत. यानंतर या पदांना उच्चस्तर समितीची मान्यता घेण्यात येईल. महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी पुढील पाच वर्षासाठी वेतनासह इतर आवर्ती आणि अनावर्ती खर्चासाठी 102 कोटी 8 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच मौजे पेठ येथील कृषी विभागाच्या ताब्यातील जमीन महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

English Summary: set up the college of food technology at yavatmal and peth in sangli
Published on: 11 September 2018, 08:38 IST