News

"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या उक्तीप्रमाणे शेतामध्ये कुठलेही पीक लागवड करण्याआधी त्या पिकाचे बियाणे दर्जेदार व उत्तम असले तर सहाजिकच येणारे उत्पादन हे दर्जेदार आणि अधिक असे मिळते.

Updated on 09 April, 2022 10:21 AM IST

 "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या उक्तीप्रमाणे शेतामध्ये कुठलेही पीक लागवड करण्याआधी त्या पिकाचे बियाणे दर्जेदार व उत्तम असले तर सहाजिकच येणारे उत्पादन हे दर्जेदार आणि अधिक असे मिळते.

तसेच फळबागांसाठी सुद्धा  लागवड करताना कलमी रोपे जर अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेली असली तरी दर्जेदार असतात आणि अशा दर्जेदार रोपांची लागवड केली तर साहाजिकच भविष्यात अशा फळ बागेपासून मिळणारे फळांचे उत्पादन देखील दर्जेदार असते. म्हणून फळबागेसाठी दर्जेदार कलमे रोपांचा पुरवठा व्हावा यासाठी रोपवाटिका देखील तसेच सुसज्ज आणि अत्याधुनिक असणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तयार आणि उत्तम आणि दर्जेदार प्रतीची रोपे मिळावीत यासाठी बारामती तालुक्यातील मौजे कन्हेरी येथे कृषी विभागाकडून अत्याधुनिक फळ रोपवाटिका तयार केली असून तिचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! तब्बल 27 कीटकनाशकांवर केंद्र सरकार आणणार बंदी; काय होईल याचा परिणाम

 कन्हेरी येथील फळरोपवाटीका कशी आहे?

 फळ रोपवाटिका स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या खडकाळ जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले व लागवड क्षम जमीन तयार करण्यात आली. या तयार केलेल्या जमिनीवर आता हा अठरा हेक्टर क्षेत्रावरील फळ रोपवाटिका प्रकल्प उभा राहत आहे.

या फळरोपवाटीका चे अठरा हेक्टर प्रक्षेत्रावर खूप उत्तम प्रकारे 5.59 हेक्टर क्षेत्र हे फळ रोपवाटिकेचे कार्यालय, तसेच शेतकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 120 लोक बसतील एवढे क्षमतेचे प्रशिक्षण हॉल, कर्मचार्‍यांसाठी घरे व अंतर्गत रस्ते इत्यादींसाठी वापरले आहे. या क्षेत्रामध्ये तीन पॉलिहाऊस उभारण्यात आले असून त्यापैकी एक पॉलिहाऊस अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फॅन व पॅड प्रकारचे आहे. दुसरे पॉलिहाऊस वायुविजन पद्धतीचे असून या शीतगृहात चा उपयोग भाजीपाल्याचे रोपे व फुलांचे उत्पादन घेण्यासाठी केला जातो. तसेच या ठिकाणी दोन शेडनेट व एक मिस्ट चेंबर देखील उभारण्यात आले आहे. या शेडनेटचा वापर हा मात्र वृक्षापासून केलेली कलमे हर्डनिंग साठी करण्यात येतो. या सगळ्या गोष्टींना पाण्याचे व्यवस्थापन करता यावे यासाठी एक विहीर व एक कोटी लिटर पाण्याची क्षमता असलेल्या चार आरसीसी टाक्या बांधलेले आहेत.

नक्की वाचा:काय सांगता! मोदी सरकारच्या सूचनेनंतर आता येथील शेतकरी बांधवाना भाडेतत्वावर मिळत आहेत शेतजमीनी; वाचा याविषयी

एवढेच नाही तर मत्स्य पालना साठी एक शेततळे देखील तयार करण्यात आले आहे. फळ लागवडीसाठी अत्याधुनिक आणि दर्जेदार रोपे मिळावेत यासाठी फळ रोपवाटिकेमध्ये डाळिंब, चिकू, अंबानी पेरू या फळपिकांचे मातृवृक्ष लागवड केली असून त्यापासून दर्जेदार रोपे तयार केली जात आहे. एवढेच नाही तर माळेगाव कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने 7.81 हेक्टर क्षेत्रावर डाळिंब, चिकु, आंबा, पेरू, कागदी लिंबू, अंजीर, सिताफळ इत्यादी फळांचे मात्र वृक्ष लागवड केली आहे. आंब्याच्या 11, चिकूचे एक डाळिंब, पेरू व सिताफळाचे प्रत्येकी तीन वाण आहेत.

English Summary: set up nursury with modern technology in kanheri pune district
Published on: 09 April 2022, 10:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)