News

शेतकऱ्यांना शेती कामात पदोपदी कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावेच लागते. अडचणींचा डोंगर कितीही मोठा असला तरी शेतकरी बंधू हार मानत नाहीत.

Updated on 14 July, 2022 7:30 AM IST

Malegaon : शेतकऱ्यांना शेती कामात पदोपदी कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावेच लागते. मात्र या सगळ्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग पण ते स्वतःच शोधत असतात. अडचणींचा डोंगर कितीही मोठा असला तरी शेतकरी बंधू हार मानत नाहीत. अशीच एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली असल्यामुळे कांद्याची साठवणूक करण्यासाठी शेतकरी बंधूनी कांदा चाळ उभारल्या मात्र त्यातील कांदा सडू लागला.

सडलेल्या कांद्याची वेळीच माहिती होणे गरजेचं असते. नाहीतर सर्वच कांदा खराब होऊ शकतो. या समस्येवर नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी असा काही तोडगा काढला आहे की त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देवळा तालुक्यातील सावकी गावचे शेतकरी सुरेश पाटील व प्रकाश पाटील यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून चाळीतील कांदा खराब होण्यापासून रोखता येणार आहे.

चाळीतील कोणता कांदा खराब झाला आहे याची पूर्वसूचना शेतकऱ्यांना सेन्सरद्वारेच मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना बराच फायदा होणार आहे. कांदा खराब झाल्याची वेळीच माहिती मिळाल्यामुळे बाकीच्या कांद्यांचे नुकसान होणे टाळता येईल व कांदा अधिकचा काळ टिकवून ठेवता येईल.

सेन्सरद्वारे ओळखा खराब कांदा
कांद्याला चांगला दर मिळावा म्हणून नाशिक जिल्ह्यात कांद्याची साठवणूक ही चाळीत केली जाते. राज्यातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदाचाळ आहे. या तंत्रज्ञानामुळे कांद्याच्या आद्रतेबाबतचे प्रमाण तसेच अमोनिया आणि इतर वायूंमुळे चाळीतील कांदा कोणत्या भागात खराब होत आहे याचा अंदाज सेन्सरद्वारे घेता येतो. शेतकरी सुरेश पाटील व प्रकाश पाटील यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचं बोललं जात आहे. शिवाय याचा शेतकऱ्यांना बराच फायदा होणार आहे.

मोदी सरकारचा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, वाचा नवे दर

कांदा चाळीत बसवले सेन्सरचे 10 युनिट
शेतकरी सुरेश पाटील आणि प्रकाश पाटील यांनी तयार केलेले तंत्रज्ञान हे कांदा चाळीत बसवले जाते. या कुटुंबीयांनी त्यांच्या साठ फूट चाळीत सुमारे चारशे ते साडेचारशे क्विंटल इतक्या कांद्याची साठवणूक केली आहे. व यामध्ये सेन्सरचे दहा युनिट बसवले असून यातून कांदा खराब होतोय का हे कळतं.

ही युनिट्स प्रत्येक कप्प्याच्या पाईपमधून खाली सोडली जातात. गोदाम इनोव्हेशन या कंपनीच्या मदतीने त्यांनी ही यंत्रणा बसवली. या सर्व प्रक्रियेला जवळपास
सव्वा ते दीड लाख रुपये इतका खर्च आला आहे. मात्र या यंत्रणेचं महत्व मोठं आहे. यातून कांदा अधिक काळ टिकतो व नंतर दर मिळाल्यास त्याची विक्रीही करता येते.

10 शेतकऱ्यांनी घेतला लाभ
सध्या या तंत्रज्ञानाचा नाशिक जिल्ह्यामध्ये 10 कांदाचाळीमध्ये वापर करण्यास सुरुवात झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा बराच फायदा होऊ शकतो.
या तंत्रज्ञानामुळे कांद्याची नासाडी टळतेच शिवाय कांदा अधिक काळ टिकण्यास मदत होते. व कांद्याला योग्य दर मिळाल्यास त्याची विक्री करणे सोपे होते.

महत्वाच्या बातम्या:
पावसाने दिली शेतकऱ्यांची साथ आणि शेतकऱ्यांनी केला पेरणीचा श्रीगणेशा
मोठी बातमी!! भारतामध्ये लवकरच येणार लोकसंख्या नियंत्रण कायदा, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

English Summary: Sensor technology eliminates worries about bad onions
Published on: 01 June 2022, 02:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)