News

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतजऱ्यांना सरकारकडून ५० हजार रुपये दिले जात आहेत. आता प्रशासनाकडून नियमितपणे आपल्या पीक कर्जाची (Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दुसरी यादी 7 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल अशी माहिती दिली आहे. या याद्या सीएससी पोर्टलवर शेतकऱ्यांना (Agricultural Information) पाहायला मिळणार आहेत.

Updated on 06 December, 2022 10:02 AM IST

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतजऱ्यांना सरकारकडून ५० हजार रुपये दिले जात आहेत. आता प्रशासनाकडून नियमितपणे आपल्या पीक कर्जाची (Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दुसरी यादी 7 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल अशी माहिती दिली आहे. या याद्या सीएससी पोर्टलवर शेतकऱ्यांना (Agricultural Information) पाहायला मिळणार आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणार आहे. शेतकरी याची वाट बघत होते. पहिल्या यादीनंतर शेतकरी हे दुसऱ्या यादीची वाट बघत होते. हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Farming) मिळणार आहे. ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करून देखील तुमची कागदपत्रे आणि पात्रता पडताळू शकता.

ज्यासाठी तुम्ही सीएससीच्या (csc) पोर्टलवर जाऊन तुमची पात्रता तसेच बँक खाते याबाबत माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल. यावर तुम्ही विचारलेली माहिती भरून तुमची पात्रता कागदपत्रे तपासू शकता. अशी यासाठीची प्रक्रिया आहे.

आता एसटीत द्या ऑनलाइन पैसे, सुट्या पैशांची कटकट मिटणार..

यामध्ये शेतकऱ्यांची पहिली यादी- 8.29 लाख, अनुदानची रक्कम - 4,000 कोटी, शेतकऱ्यांची दुसरी यादी- 10 लाख, अनुदानाची रक्कम- 5,000 कोटी शेतकऱ्यांची तिसरी यादी- 4.85 लाख, अनुदानाची रक्कम- 1,200 कोटी अशा प्रकारे रक्कम आणि शेतकरी असणार आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

आता पाणीपट्टी थकवली की न्यायालयाची नोटीस, ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे धाबे दणाणले..

दरम्यान, नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
नेतेच थकबाकीदार! औरंगाबादचे पालकमंत्री भुमरेंच्या पुत्राच्या नावावर 1 लाख 31 हजारांची थकबाकी
विश्‍वास साखर कारखान्याकडून प्रतिटन ३ हजार रुपये वर्ग, कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती
'शेतकर्‍यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला'

English Summary: second list of 50 thousand incentive grant arrived, announced
Published on: 06 December 2022, 10:02 IST