कांदा कधी हसवतो तर कधी रडवतो, याचाच प्रत्येय आता आला आहे. गेल्या काही दिवसात कांदा दोन ते तीन रुपये किलोने विकला जात असताना आता मात्र दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही महिन्यांत भाव आणखी वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तीन महिन्यांपासून कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला होता. शेतकर्यांना कांदा फेकून द्यावा लागला होता.
यामुळे या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आता चांगल्या प्रतीचा कांदा 16 ते 17 रुपये किलो दराने विकला जात आहे. आता राज्यातील सर्वच मंडईंमध्ये भाव वाढत आहेत. लवकरच भाव आणखी वाढतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. असे असले तरी आता जो दर वाढला आहे तो शेतकऱ्यांच्या खर्चापेक्षा कमी आहे. कांद्याचे भाव ३० रुपये किलोपर्यंत येतील तेव्हाच खरा दिलासा मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आता पावसाळ्यात कांद्याची आवक घटल्याने पावसाळ्यात कांद्याचे भाव सुधारतील, अशी अपेक्षा आहे. फक्त साठवणूक सुविधा असलेले शेतकरीच बाजारात कांदा विकू शकतात. अनेकांनी भाव वाढतील म्हणून कांदा साठवला मात्र अनेकांचा कांदा हा नासून गेला, यामुळे जास्त पैसे कमवण्याच्या नादात कांदा हा सडून गेला. काही शेतकऱ्यांनी तो शेतात फेकून दिला.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजरी पिकाचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार
दरम्यान उन्हाळी हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याची आवक अधिक आहे. मात्र, बाजारात मागणी कमी असल्याने कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरतच राहिल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होऊ शकला नाही. काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड बंद केल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आता शाळा देखील सुरु झाल्याने दर अजून वाढतील, असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी नेत्याला दिली नवी कोरी फॉर्च्युनर भेट, राजू शेट्टींवर शेतकऱ्यांचे प्रेम अजूनही कायम
शेतकऱ्यांनो रासायनिकपेक्षा जीवामृतच फायदेशीर, आता घरच्या घरीच करा तयार...
राज्यातील 6 कंपन्यांकडून बोगस खताची निर्मिती, केंद्राने दिले फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश
Published on: 15 June 2022, 05:33 IST