सध्या अनेक साखर कारखाने हे बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. तसेच काही कारखाने हे बंद देखील पडले आहेत. हेच कारखाने बंद पडू नयेत म्हणून अनेकदा शेतकऱ्यांची तळमळ दिसून येते. आता प्रदूषण मंडळाने कुमठे येथील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास दिलेली नोटीस मागे घ्यावी, यासाठी आंदोलन सुरू आहे.
त्यासाठी गेल्या 32 दिवसांपासून सुरू आंदोलन सुरु आहे. असे असताना उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सिध्देश्वर राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अशोक बिराजदार व शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे.
त्यांनी कारखान्याविरुध्दच्या सर्व नोटिसा मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे याची चर्चा रंगली आहे.
शेतकऱ्यांनो तुम्हाला शेळ्यांच्या 'या' जाती माहिती आहेत का? देतात फायदेशीर उत्पादन..
आपला कारखाना वाचवण्यासाठी कारखान्यावर 32 दिवसांपासून कामगारांचे तर शेतकर्यांचे 31 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. असे असताना आंदोलनाची दखल कोणी घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
जानेवारीत कापसाचे भाव वाढणार, शेतकऱ्यांनो थोडा धीर धरा..
कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळाच्या 15 नंबर धावपट्टीवरून विमानसेवा सुरू करा. कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
बारामतीत बेकायदा कत्तलखान्याबाबत नगरपालिकेला नोटीस, दोन वर्षांपूर्वी अजित पवारांनी दिले होत आदेश
तसेच या मागण्यासाठी रस्ता रोको देखील करण्यात आला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पत्राची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
हाडं गोठवणारी थंडी, बिबट्याची भीती, रात्रीची वीज, शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तशीच..
भीमा पाटसची गाडी अखेर रुळावर, ८ दिवसात १९ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप, शेतकरी समाधानी
Beed Farmers; शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर उचलले पैसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील घटना..
Published on: 28 December 2022, 01:36 IST