गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी अवकाळी गारपीट ढगाळ वातावरण या निसर्गाच्या लहरी स्वभावामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. यामुळे बळिराज चिंतेत आहे. सरकारकडून देखील शेतकऱ्यांची बाजू घेतली जात नाही.
अनेक दिवसांपासून शेतीसाठी वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप ही तोडगा निघालेला नाही. अशातच एका पीडित शेतकऱ्यांना थेट विद्युत वितरणच्या अधीक्षक यांच्या समोर आपली व्यथा मांडली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सगळ्या राज्यात सुरु आहे. बीडच्या खांडे पारगाव, नागपूर खुर्द, अंतरवन पिंपरी यासह जवळपास 7 गावांमध्ये लाईट तोडण्यात आली आहे. याचा विस्कळीतपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.
तसेच सध्या उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यात लाईट विस्कळीत असल्याने पीक जळून चालली आहेत. बीड शहरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी साहेब पाया पडतो, लाईटची भीक मागतो, पीक जळतायत वीज द्या, अशी मागणी करत लव्हाळे नामक शेतकऱ्याने टाहो फोडला. यामुळे शेतकरी कोणत्या परिस्थितीतुन जात आहे, याचा अंदाज येतोय.
'साहेब, माझ्या खिशात पैसा नाही म्हणून साहेब तुम्हाला भीक मागतोय, केवळ आम्हाला लाईट द्या, बाकी काही नको. आमचं उभ पीक जळत आहे. असे या शेतकऱ्याने म्हटले आहे. आम्ही काय तुमचे दुश्मन नाहीत. आम्ही कुणावर अन्याय केलाय का? आम्ही काय बँक लुटलीये का? असा प्रश्नही या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या;
Fertilizer: खरिपाच्या तोंडावर खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, शेतकऱ्यांनो 'हे' दर बघूनच खरेदी करा..
अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांच्या घरच्यांना मिळतात २ लाख, योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांची कुटूंब सावरली..
आता जुन्नरचे नाव सातासमुद्रापार घुमणार! शिवनेरी हापूसबाबाबत हालचाली सुरु..
Published on: 06 April 2022, 10:09 IST