सध्या टोमॅटो हा सगळीकडे चर्चेचा विषय झाला आहे. यामुळे तो खरेदी करताना अनेकदा विचार करावा लागतोय. आता सध्या टोमॅटोचे भाव खूपच वाढले आहेत. महाराष्ट्रात घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोने किंमतीचा उच्चांक गाठला आहे.
यामुळे तो खरेदी करणे अवघड झाले आहे. सध्या बाजारपेठेत एक किलो टोमॅटोसाठी 160 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. यासाठी सरकारला जबाबदार धरले जात आहे. असे असताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरुन आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांना चांगलेच सुनावले आहे.
टोमॅटो मिळाला नाही म्हणून लगेच दोन-चार जण टाचा खुडून मेलेत का? टोमॅटो हा काही अॅटम बॉम्ब नाही. जरा दोन-तीन महिने थांबा. त्यानंतर ज्याला ज्याला लय टोमॅटो लागतात, त्यांना आम्ही सरणाला पण टोमॅटो देऊ, असे ते म्हणाले.
लासलगावमध्ये डाळिंब प्रतिक्रेट २०११ रुपये भाव, शेतकऱ्यांना दिलासा..
तसेच मग सरणासाठी लाकडं वापरुच नका, जाळण्यासाठी फक्त टोमॅटोच वापरा. आपल्याकडे काय फक्त टोमॅटोच आहेत का, फ्लावर हाय, कोबू हाय, बटाटू हाय, घेवडा हाय, शेवगा हाय, उडीद हाय, मूग हाय, ते खा, असेही खोत म्हणाले.
शेतकरी नेत्यांना मोठा धक्का! राजू शेट्टी, खोत, पाटील यांना ऊस दर नियंत्रण मंडळातून वगळले...
तसेच टोमॅटो काय जीवनावश्यक वस्तू आहे का? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. सदाभाऊ खोत यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मी आधीच सांगितले होत की, कांदा परवडत नसेल तर टोमॅटो खावा, आता सांगतो टोमॅटो नाय तर कांदा खा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
डाळींबाची कोण जात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, जाणून घ्या..
कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता, दुष्काळी भागाला पाणी मिळणार
शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले की टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारच्या हालचारी सुरू! आयुक्तांकडून बैठक
Published on: 14 July 2023, 01:08 IST