गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. हंगाम संपत आला तरी अजूनही राज्यात १५ टक्के ऊस हा फडातच आहे. यामुळे आताच हे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात यामुळे घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे.
असे असताना आता अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानं पुणे येथील साखर संकुल येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी गाळपास दिरंगाई झाल्यामुळे नुकसान झालेल्या उसाला प्रती टन पाचशे रुपये एवढी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. यामुळे आता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ऊस पिकावर उचललेले पीक कर्ज विहित मुदतीत न भरल्यास शेतकरी थकबाकीदार बनल्याने कर्ज व्याजमाफीच्या लाभापासून वंचित राहतात. तसेच उसाच्या एफआरपीचे तुकडे केल्यानेही शेतकरी थकबाकीदार बनतात. शेतकऱ्यांना यामुळे मोठा तोटा होतो. शेतकरी थकबाकीदार होऊ नये अशा प्रकारे ऊस गाळप व पेमेंटचे नियोजन करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस गाळपाअभावी शेतात राहणार नाही याची हमी यावेळी गायकवाड यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिली. सध्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेत ऊस तोडणी मुकादम ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून जास्तीचे प्रती एकरी 10 हजार रुपये मागत आहेत. वाहतुकीवाले गाडीमागे 1 हजार रुपये घेत आहेत. यामुळे उसाची शेती आता नकोशी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या;
गायींना गाणी ऐकवली तर तब्बल ५ लिटर दूध जास्त देतात, तरुणाने विडिओ बनवून केले सिद्ध
कलिंगड लाल आणि चवीला गोड ओळखावे कसे? वाचा सोप्पी पद्धत..
बातमी कामाची! सरकारचा एक निर्णय आणि लाखो शेतकऱ्यांचा फायदा, जाणून घ्या 'या' योजनेबद्दल
Published on: 02 April 2022, 10:48 IST