शनिवार दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी अंधेरी, मुंबई येथील भुवन कॅम्पस येथे कृषी डिजिटल तंत्रज्ञानाविषयी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. सी.आय.आय. महाराष्ट्र टास्क फोर्स ऑन ऍग्रीकल्चर आणि एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ही गोलमेज परिषद भरवण्यात आली होती. कृषी क्षेत्रात हित आणि उन्नती डिजिटल तंत्रज्ञानातून कशी साधता येईल याविषयी तीन प्रमुख चर्चासत्रे या परिषदेत दरम्यान झाली.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या अपेक्षा समजून घेऊन कृषी तंत्रज्ञानाची निर्मिती करणे हा या चर्चासत्राचा केंद्रबिंदू होता. विविध तंत्रज्ञानाचा वापर व त्याचा अवलंब करण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ विकसित करणे तसेच तंत्रज्ञानाद्वारे उपजीविकेची साधने निर्माण करून ग्रामीण भागातील लोकांना प्रोत्साहित करणे हे सुद्धा या चर्चासत्राचे उद्दिष्ट होते. या टास्क फोर्सद्वारे विविध पॉलिसी डॉक्युमेंट बनवून ॲग्री टेक या विषयात इंडस्ट्री पायलट उभा करणे तसेच या विषयासंदर्भातील पुढील प्रगती तसेच भविष्यातील दिशा ठरवणे हे सुद्धा एक प्रमुख उद्दिष्ट होते.
कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ या गोलमेज परिषदेतील चर्चासत्रांमध्ये सहभागी झाले होते. विविध कंपन्यातील प्रतिनिधी व त्यांचे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तसेच त्यांनी या चर्चासत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केयर लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर तसेच सीआयआयच्या महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स ऑन ऍग्रीकल्चरचे कन्व्हेनर श्री. विलास शिंदे यांनी कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या संबंधात सी आय आय करत असलेल्या कामगिरीबद्दलचा आढावा त्यांनी घेतला. कृषी क्षेत्रामधील पुरवठा साखळीमध्ये माहितीच्या तसेच योग्य तंत्रज्ञानाच्या अभावी येत असलेल्या विविध अडचणींचा याप्रसंगी त्यांनी उल्लेख केला. डिजिटल क्षेत्राची कृषी क्षेत्राशी जोड झाल्यास भावी पिढीला त्याचा काय उपयोग होऊ शकतो या संदर्भातही त्यांनी अनेक संकल्पना मांडल्या.
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रामध्ये श्री. व्ही. शंकर, डॉ. वरूण नागराज, डॉ. सुनील गोरंटीवार यांनी कृषी क्षेत्रातील संशोधन तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर याबाबत होत असलेल्या चालू घडामोडी बद्दल सविस्तर माहिती दिली. सकाळच्या सत्राच्या समारोपीय भाषणात सी.आय.आय. महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स ऑन एग्रीकल्चरचे को-कन्वेनर तसेच बी. जी. चितळे डेरिज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. गिरीश चितळे यांनी त्यांचे विचार मांडले.
दुपारच्या सत्रामध्ये कृषी क्षेत्राच्या सद्यस्थिती तसेच भविष्यात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणाऱ्या क्रांती बद्दल तसेच त्यामुळे घडत असलेल्या विविध बदलांमधून निर्माण होणाऱ्या संधीबद्दल श्री. व्ही. शंकर यांनी विविध मान्यवराबरोबर परिसंवादाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली. श्री. रोहन उरसाळ, अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पुरंदर हायलँड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, श्री. संदीप शिंदे सेंटर हेड डिजिटल सोशल इनोवेशन टीसीएस फाउंडेशन, श्री. अक्षय दीक्षित डायरेक्टर,वेस्तोगो इनोवेशन्स हे याप्रसंगी उपस्थित होते.
कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने संधी तसेच पॉलिसीमधील बदल यासंदर्भात बोलण्यासाठी श्री. अक्षय दीक्षित, श्रीमती. भावना निर्मल, हेड बिजनेस डेव्हलपमेंट ॲग्री इंटरप्रीनर ग्रोथ फाउंडेशन, डॉ. संगीता लाधा, बिजनेस डायरेक्टर रिवूलीस इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना आमंत्रित केले होते. कृषी क्षेत्रातील आव्हाना बद्दल तसेच या आव्हानावर असणाऱ्या उपायाबद्दल माती, पाणी, सेन्सर टेक्नॉलॉजी, विमा, परवडणारे तंत्रज्ञान अर्थकारण, पुरवठा साखळी यासंदर्भात सखोल चर्चा झाली.
त्याशिवाय तंत्रज्ञानाचा वापर तसेच त्याचे अवलंबन करण्यासंदर्भात मनुष्यबळ विकसित करणे आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करणे हेही या चर्चेचे उद्दिष्ट होते. श्री. गिरीश चितळे यांनी या सत्राचे समारोपीय भाषण केले व पाहुण्यांचे आभार मानले.
पशुसंवर्धन विभाग व धेनू ॲप आयोजित, दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल कार्यशाळा संपन्न...
कार्यक्रमाच्या शेवटी एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील सेंटर फॉर इनोव्हेशन इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट या केंद्राचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात पणी यांनी कार्यक्रमाचा आढावा घेत सर्व पाहुण्यांचे तसेच आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या स्नेहभोजना दरम्यान विविध ठिकाणाहून आलेले मान्यवर एकमेकांना भेटले व या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिझनेस नेटवर्किंगचा लाभ त्यांनी घेतला.
पी. आर. पोटे-पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार धेनू ॲपद्वारे डिजिटल उद्यमीता प्रशिक्षण...
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात धेनूच्या डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on: 01 September 2023, 01:06 IST