News

तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐण सणासुदीच्या काळात तांदूळ महागणार असल्याने तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Updated on 19 September, 2022 3:38 PM IST

तांदूळ उत्पादक (Rice grower) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐण सणासुदीच्या काळात तांदूळ महागणार असल्याने तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

तांदूळ-गहूसारखे खाद्यपदार्थ महाग झाले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. आगामी काळातही महागाई उच्च पातळीवर राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. महत्वाचे म्हणजे जून-सप्टेंबरमधील अनियमित पाऊस (rain) यामुळे धान पिकाची चिंता वाढली आहे.

ज्वारी-बाजरी आणि इतर तृणधान्यांसाठी देशात 3 केंद्रे स्थापन; शेतकऱ्यांना होणार फायदा

भारताचे तांदूळ उत्पादन 2021-22 या पीक वर्षात 132.29 दशलक्ष टन होते, जे एका वर्षापूर्वी 1243.7 दशलक्ष टन होते. यावर्षी खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ६० ते ७० लाख टनांनी कमी होणार आहे, असा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

शरीरासोबत मनाचंही आरोग्य उत्तम ठेवायचं आहे? तर लक्षात ठेवा फक्त ४ सूत्रं

देशातील एकूण तांदूळ उत्पादनात खरीप हंगामाचा वाटा सुमारे ८५ टक्के आहे. महत्वाचे म्हणजे काही तज्ञांच्या मते तांदूळ उत्पादनातील घट हे चिंतेचे कारण नाही कारण भारताचा आधीच अस्तित्वात असलेला साठा सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे, असे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे तुकड तांदळाच्या (rice) निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि बिगर बासमती निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 
सरकारच्या 'या' योजनेत 1 लाख रूपयांचे होतील 5 लाख रुपये; एकदा गुंतवणूक करून पहाच
शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव नुकसान भरपाई मिळणार; सरकारकडून अधिसूचना जारी
पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली; भाज्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ

English Summary: Rice expensive festival Common people pay extra money
Published on: 19 September 2022, 03:34 IST