News

सध्या राज्यात खत बियाणांबाबत शेतकऱ्यांची बरीच लूट केली जात आहे. कधी बोगस बियाणे देऊन तर कधी अधिक दराने बियाणे विकून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. यात शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे. ही लूट थांबावी यासाठी राज्य सरकार,व कृषी विभाग सज्ज झाले आहेत.

Updated on 06 June, 2022 5:31 PM IST

सध्या राज्यात खत बियाणांबाबत शेतकऱ्यांची बरीच लूट केली जात आहे. कधी बोगस बियाणे देऊन तर कधी अधिक दराने बियाणे विकून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. यात शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे. ही लूट थांबावी यासाठी राज्य सरकार,व कृषी विभाग सज्ज झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून तब्ब्ल तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत.

खत-बियाणांबाबत अनियमितता
कृषी विभागाने 9 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. खरीब हंगाम सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यातील खत-बियाणांबाबत अनियमितता आढळून आल्यामुळे या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारची अनियमितता वाढू नये यासाठी कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वीच खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी अफवा पसरवली जात आहे तसेच तुटवडा निर्माण झाल्यास खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकेल असे चित्र निर्माण केले जात आहे. या प्रक्रियेवर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे.

गणेश, प्रगती आणि प्रशांत कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द
बाजारपेठेत खत-बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याप्रकरणी त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या भागात बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना अधिक दराने विक्री केली जात होती. कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांची फसवणूक करतात म्हणून कृषी विभाग आता सज्ज झाले आहेत. कृषी विभागाच्यावतीने भरारी पथकांकडून केलेल्या कारवाईत आता कन्नड तालुक्यातील 3 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याआधी वर्धा येथे कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान एक जून पूर्वी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कापसाच्या बियाणांची विक्री करू नये, असे राज्य सरकारने परिपत्रक काढले होते. मात्र तरीही अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले. आणि त्यामुळेच आता कृषी विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नियमांचे उल्लंघन करुन बियाणांची विक्री करणे तसेच बियाणे कंपनीने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. गणेश, प्रगती आणि प्रशांत कृषी सेवा केंद्र या तीनही दुकानात शेतकऱ्यांना अधिक दराने बियाणांची विक्री केली जात होती.

आता तासंतास नंबरला बसण्याची गरज नाही; फिरत्या सलूनची होतीये राज्यभर चर्चा

भरारी पथकांनी वेळीच लगाम लावल्यामुळे आता तरी शेतकऱ्यांची लूट होण्यापासून वाचेल अशी आशा आहे. बऱ्याचदा काळजी घेऊन देखील शेतातील उत्पादनात घट होते. घट होण्यापाठीमागे बरीच कारणे असतात. मात्र सध्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा वापर चांगलाच महागात पडला आहे. बोगस बियाणे वापरल्यामुळे बऱ्याच नुकसानीला शेतकरी सामोरे जात आहेत. बोगस बियाणांमुळे त्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जारी केल्या.

महत्वाच्या बातम्या:
इतिहासात पहिल्यांदाच; भारतीय चलनावर महात्मा गांधींपाठोपाठ या व्यक्तींचे फोटो लागणार
शेतकऱ्यांनो काळजी घ्या; पुढील चार दिवस महत्वाचे,13 जिल्ह्यांमध्ये जारी केला यलो अलर्ट

English Summary: Revocation of licenses of agricultural service centers; Major action of agriculture department
Published on: 06 June 2022, 05:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)