News

सात बारा आणि आठ अ उतारा या दोन्ही कागदपत्रांचा विचार केला तर यांना शेतजमिनीचा आरसा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेतकर्यांशी फार घनिष्ठ संबंध असलेल्या या सातबाराच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली असून सातबाऱ्यावर ज्या काही चुका होत्या जसे की सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षात असलेली शेतकऱ्याकडील जमीन यामध्ये जो काही फरक होता तो, तसेच कब्जेदार सदरी असलेल्या नावात चुका, तसेच सातबारा उताऱ्यावर काही चुकीच्या पद्धतीने झालेल्या नोंदी असे मिळून 46 प्रकारचे जे काही दोष होते आता महसूल विभागाने दूर केले असून यात महसूल विभागाला यश आले आहे.

Updated on 02 August, 2022 9:18 AM IST

 सात बारा आणि आठ अ उतारा या दोन्ही कागदपत्रांचा विचार केला तर यांना शेतजमिनीचा आरसा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेतकर्‍यांशी फार घनिष्ठ संबंध असलेल्या या सातबाराच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली असून सातबाऱ्यावर ज्या काही चुका होत्या जसे की सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षात असलेली शेतकऱ्याकडील जमीन यामध्ये जो काही फरक होता तो, तसेच कब्जेदार सदरी असलेल्या नावात चुका, तसेच सातबारा उताऱ्यावर काही चुकीच्या पद्धतीने झालेल्या नोंदी असे मिळून 46 प्रकारचे जे काही दोष होते आता महसूल विभागाने दूर केले असून यात महसूल विभागाला यश आले आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो इकडे द्या लक्ष! खरीप पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला जारी; जाणून घ्या...

काय आहे नेमके प्रकरण?

 भूमिअभिलेख विभागाने ई फेरफार प्रकल्पाचे काम हाती घेतले असून या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील अडीच लाखांपेक्षा जास्त सातबारा उताराचे कम्प्युटरायझेशन करण्यात येत आहे.

सातबारा उताऱ्यावर ज्या काही नोंदी घेतल्या जातात त्याच्या विभागानुसार वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्यामुळे सातबारा उतारा मध्ये बरेच प्रकारचे विसंगती किंवा दोष निर्माण झाले होते. या सर्व विसंगतीमध्ये शेचाळीस प्रकारच्या ज्या काही विसंगती होत्या या स्पष्ट झाल्या होत्या.

नक्की वाचा:मुख्यमंत्र्यांची घोषणा: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना एनडीआरएफच्या निधीत रक्कम वाढवून मिळणार मदत

त्यामुळे 2018 पासून सातबारा उतारा बिनचूक कसा करता येईल यासंबंधीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. या माध्यमातून 98 टक्के पेक्षा जास्त त्रुटी दूर करून संपूर्ण सातबारा उतारा चे संगणकीकरण करण्यात आले आहे.

जे काही अजून सातबारा उतारा यांच्या दुरुस्तीचे काम बाकी आहे ते मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून करण्यात येत आहे.

एकूण दोन लाख 54 हजार सातबार्‍यापैकी केवळ 46 हजार सातबारा उतारा मध्ये दुरुस्तीचे काम अद्याप शिल्लक असून ते देखील लवकरच केले जाणार असे महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा:1 August: आज पासून 'या' गोष्टींची संपली मुदत आणि 'या' गोष्टींमध्ये झाला बदल,काय होऊ शकतो तुमच्यावर परिणाम?

English Summary: revenue department remove 46 fault from saatbara utaara
Published on: 02 August 2022, 09:18 IST