News

गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात असलेले पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावयसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून याबाबत सुनावणी सुरू होती. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट विकत घेणाऱ्याकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा त्या खरेदीदारांना दिलाच नाही असे आरोप त्यांच्यावर आहेत. यामुळे ते अटकेत होते. अखेर या मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Updated on 22 July, 2022 12:04 PM IST

गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात असलेले पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावयसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून याबाबत सुनावणी सुरू होती. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट विकत घेणाऱ्याकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा त्या खरेदीदारांना दिलाच नाही असे आरोप त्यांच्यावर आहेत.

यामुळे ते अटकेत होते. अखेर या मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांची मालमत्ता देखील जप्तीचे आदेश देण्यात आले होते. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मुख्य गुन्ह्यात डीएसके आणि इतर आरोपी 17 फेब्रुवारी 2018 पासून तुरुंगात आहेत. अखेर त्यांना आता जामीन मिळाला आहे.

त्यांना जामीन मिळावा म्हणून डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि ऍड. रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता. मुख्य गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी देखील डीएसके यांनी अर्ज केलेला आहे.

अमित शहांच्या सहकार मंत्राल्यास शरद पवार करणार मार्गदर्शन, सरकार मंत्रालयाने केलेली विनंती

हा अर्ज सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर 26 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सत्र न्यायाधीश एस.के. डुगावकर यांनी हा आदेश दिला. यामुळे आता पुढे गुंतवणूकदारांचे काय होणार याकडे सर्वांचे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, एकमेकांवर बॉम्ब फेकले, राजकीय वातावरण तापले..
एक नंबर! अवघ्या २९९ रुपयांत तब्बल १० लाखांचा विमा, वाचा सविस्तर..
खर की काय! गाई- म्हशींना मीठ दिल्यास वाढती दुधाची क्षमता? वाचा तज्ञांची प्रतिक्रिया

English Summary: Renowned construction professional d. S. Kulkarni granted bail
Published on: 22 July 2022, 12:04 IST