News

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे खरीप आढावा बैठकीसाठी (kharip) नाशिक दौऱ्यावर होते.अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे राज्यभरातील अनेक शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनपातळीवर या नुकसान भरपाई साठी पंचनामे करण्याचे आदेश शासनाने (maharashtra government)दिले आहेत.

Updated on 08 May, 2023 3:06 PM IST

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे खरीप आढावा बैठकीसाठी (kharip) नाशिक दौऱ्यावर होते.अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे राज्यभरातील अनेक शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनपातळीवर या नुकसान भरपाई साठी पंचनामे करण्याचे आदेश शासनाने (maharashtra government) दिले आहेत.

असे असताना शेतकऱ्यांची मागणी असूनही अधिकारी वर्गाकडून पंचनामे करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी सर्रास होत आहेत. अब्दुल सत्तार म्हणाले, एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिलेला नाही." त्यावर निफाड तालुक्यातील लोणवाडी येथील अपंग द्राक्षाचे वादळी पावसामुळे मोठे नुकसान होऊनही वेळीच पंचनामा न झाल्याबाबत कृषिमंत्री आक्रमक होऊन कृषी अधिकाऱ्यांवर भडकले.

दौरा संपण्यापूर्वी या पंचनाम्याबाबत माहिती द्या, असे खडेबोल त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. द्राक्ष उत्पादक शेतकरी विजय दौड याच्या द्राक्षमालाला तडे गेल्याने निर्यातक्षम द्राक्ष मातीमोल झाले होते. मात्र त्यांच्या पिकाच्या पंचनाम्यास कृषी सहायकाने टाळाटाळ केली होती. यामुळे कारवाईची मागणी केली जात होती.

आता धेनू अ‍ॅपमधील डिजिमार्ट देणार व्यावसायिकांना लाखों रुपये कमावण्याची संधी...

कृषिमंत्र्यांच्या आदेशामुळे आता बेजबाबदार अधिकाऱ्यांची निलंबन होत असून अपंग शेतकरी विजय दौड यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान अस्मानी संकटामुळे ( natural disaster) अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला (farmer)मदत देणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यासाठी आवश्यक पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करणे ही कृषी विभागाच्या जबाबदारी आहे.

बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस मधील संशोधनाबाबत सामंजस्य करार

कोणतेही कारण देत पंचनामा नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही त्यामुळे अपंग शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला निलंबित करा, असे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar)यांनी दिले आहेत. यामुळे आता कामचुकार अधिकरी वटणीवर येतील.

आता मजुरांनाही मिळणार विम्याचा लाभ, जाणून घ्या...
गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...
गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...

English Summary: Refusal to do Panchnama of heavy rains, Agriculture Minister directly suspended..
Published on: 08 May 2023, 03:06 IST